Badlapur Saam TV
Video

Badlapur : बदलापूरमध्ये स्टंटबाजी करताना तरुणाने महिलेला उडवले, पहा अपघाताचा VIDEO

Shocking Bike Stunt Incident in Badlapur : बदलापूरमध्ये एका स्टंटबाज बाईकस्वाराने स्टंटबाजी करण्याच्या नादात महिलेला आणि एका दुचाकीस्वाराला उडवल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बदलापूर पश्चिमेकडील मांजर्ली परिसरातील मोहन ग्रीनवुड येथे २४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता दोन दुचाकीस्वारांनी स्टंट करत धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे. या स्टंटबाजांनी प्रथम रस्त्याने जाणाऱ्या एका महिलेला उडवलं, त्यानंतर दुसऱ्या दुचाकीला धडक दिली आणि स्वतःही खाली पडले.ही धक्कादायक घटना स्थानिक ट्युशन क्लासच्या बाहेर घडली आहे. क्लासच्या बाहेर उभ्या असलेल्या विद्यार्थिनींच्या समोर ‘शायनिंग’ मारण्यासाठी या तरुणांनी स्टंटबाजी केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेनंतर परिसरात खळबळ माजली असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मात्र, या घटनेला आता दोन दिवस उलटल्यानंतरही बदलापूर पश्चिम पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे त्वरित कारवाईची मागणी केली असून, स्टंटबाजांवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचं स्पष्ट केलं आहे. अन्यथा अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२४ तासांत ७ वरिष्ठ लष्करी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची बदली, देशात खळबळ

Maharashtra News Live Update : आंबोलीत भटक्या कुत्र्यांचा सांबरच्या पिल्लावर हल्ला

Railway News : स्टेशनवर कसून तपासणी...पार्सल सेवा बंद! रेल्वे प्रवाशांसाठी अॅडव्हायझरी, किती दिवस अन् कारण काय?

Hair Care: २ वॉशमध्ये केस होतील सॉफ्ट आणि सिल्की; घरी तयार करा हा हेल्दी हेअर मास्क

Hair Care : रात्री केस बांधून झोपताय? 'या' महत्त्वाच्या ६ गोष्टी जाणून घ्या नाहीतर पडेल टक्कल

SCROLL FOR NEXT