Badlapur  SAAM TV
Video

Badlapur Local : दसरानिमित्त लोकल सजवली, डब्यात पताका लावल्या; प्रवाशांनी प्लॅटफॉर्मवर खेळल्या फुगड्या, VIDEO

Dussehra Celebration : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलची बदलापूरकरच्या प्रवाशांनी सजावट करत आनंदोत्सव साजरा केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बदलापूरकर प्रवाशांनी मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमध्ये आगळावेगळा उत्सव साजरा केला. बदलापूर रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांनी पारंपारिक पध्दतीने भोंडल्याचा फेर धरला आणि फुगड्या खेळत आनंद व्यक्त केला आहे. यावेळी प्रवाशांनी लोकलच्या डब्यांना रंगीबेरंगी पताका, फुगे आणि फुलांची आरास करून डब्बे सजवले. लोकलमध्ये सजावट पाहून प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. दसऱ्याच्या निमित्ताने केलेल्या या उपक्रमामुळे लोकलमध्ये सणासुदीचे वातावरण अनुभवायला मिळाले. प्रवाशांनी परस्परांना शुभेच्छा देत आनंदोत्सवाचे रूपांतर लोकलमध्ये केले असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT