Prahar leader Bachchu Kadu announces ₹1 lakh reward against Minister Radhakrishna Vikhe Patil after his controversial farmers’ remark. Saam Tv
Video

Maharashtra Politics: जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपये बक्षीस, बच्चू कडूंची घोषणा|VIDEO

Bachchu Kadu Announces ₹1 Lakh Reward: राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शेतकरी कर्जमाफीवरील वक्तव्यावर बच्चू कडू चांगलेच संतापले आहे. जो विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला माझ्याकडून एक लाख रुपये बक्षीस," अशी घोषणा बच्चू कडू यांनी केली असून राजकारणात खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

भाजपाचे नेते राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल. त्याला 1 लाख रुपयाचे माझ्याकडून बक्षीस दिले जाईल अशी घोषणा बच्चू कडू यांनी केली. आणि मला जर विखे पाटलांची गाडी दिसली तर मी त्यांची गाडी फोडणार असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला.

नाव राधाकृष्ण, कृत्य मात्र कंसाचं करायचे असेल तर कंसाची ही अवलाद मुख्यमंत्र्यांनी हाकलून लावली पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. फडवणीस साहेब एकीकडे कर्जमाफीची घोषणा करता आणि वाचाळविळ मंत्री असे वक्तव्य करत आहे. शुकरमाना लोक तुम्हाला मारत नाही त्यामुळे ही नालायकी थांबवा अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बुलढाण्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार डिव्हायडरवर आदळली

मोठी बातमी! अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर क्राइम ब्रांचची कारवाई

Sleeveless Blouse Designs:स्लीव्हलेस ब्लाऊज कोणत्या साडीवर परफेक्ट दिसतो? स्टायलिश राहण्यासाठी या टिप्स करा फॉलो

निवडणुकीचं मैदान मारलं, पण नियतीने हरवलं; राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेविकेचा मृत्यू, राजकीय वर्तुळात हळहळ

Black Blouse Design: काळ्या साडीवर खुलून दिसेल तुमचा तोरा! हे आहेत 5 युनिक ब्लाऊज पॅटर्न

SCROLL FOR NEXT