Bachchu Kadu News Update SaamTv
Video

Maharashtra Politics : तिसऱ्या आघाडीवर शिक्कामोर्तब; बघा काय म्हणाले बच्चू कडू

Bachchu Kadu : बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीवर शिक्कामोर्तब झालं असल्याची माहिती दिली आहे. 'परिवर्तन महाशक्ती' या नावाने ही तिसरी आघाडी करण्यात येणार आहे.

Saam Tv

राज्यातील तिसऱ्या आघाडीवर शिक्कामोर्तब झालं असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. 'परिवर्तन महाशक्ती' या नावाने ही तिसरी आघाडी करण्यात येणार असून याची लवकरच घोषणा करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आहे. पुण्यात गुरुवारी या तिसऱ्या आघाडी संदर्भात बैठक झाली आहे. ''आघाडी पण नाही, युती पण नाही, आमची 'परिवर्तन महाशक्ती' म्हणून आम्ही समोर जाणार,'' असं बच्चू कडू यांनी यावेळी बोलताना म्हंटल.

आगामी विधानसभेच्या दृष्टीने राज्यात रोज नवीन समीकरणं तयार होत आहेत. अशातच राज्यात तिसरी आघाडी स्थापन होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता यावर शिक्कामोर्तब झालं असून याबद्दल बच्चू कडू यांनी माहिती दिली आहे. पुण्यात यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला बच्चू कडू, राजू शेट्टी आणि शंभुराज देसाई उपस्थित होते. 'परिवर्तन महाशक्ती' या नावाने ही तिसरी आघाडी करण्यात येणार आहे. तिसऱ्या आघाडीत समन्वय समिती करून सगळे निर्णय घेतले जातील, ज्यांना या आघाडीत यायचं आहे त्यांनी 26 सप्टेंबरपर्यंत सहभागी व्हायला हवं असं आवाहनही राजू शेट्टी यांनी केलं आहे. या तिसऱ्या आघाडीचा मेळावा येत्या 26 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. दरम्यान, या तिसऱ्या आघाडीमुळे विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीची समीकरणं बदलतील का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अनेक लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली - देवेंद्र फडणवीस

BSNL Satellite Phone : iPhone पेक्षाही महाग BSNL चा सॅटेलाइट फोन! नेटवर्कशिवायही करता येणार कॉल

Crispy Corn Bhaji: पावसाळ्यात चहासोबत बनवा खमंग क्रिस्पी कॉर्न भजी; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळणे, कोंडा आणि चिकटपणा टाळायचा? मग घरीच घ्या केसांची अशी काळजी

Steel Tea Strainer: घाणेरडी काळी झालेली चहाची गाळणी मिनिटांत चमकेल! फक्त वापरा 'हा' १ सोपा घरगुती उपाय; दिसेल जादू

SCROLL FOR NEXT