Mumbra Auto Rikshaw driver fighting saam tv
Video

रिक्षाचालकांची तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल झाल्यानंतर खळबळ

Auto driver fighting video : रिक्षाचालकांमधील तुफान हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. चार ते पाच रिक्षाचालकांनी एका रिक्षाचालकाला मारहाण केली.

Nandkumar Joshi

विकास काटे, साम प्रतिनिधी, ठाणे

मुंब्रा इथल्या मिलेनियम पार्क इथं रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी झाली. एका रिक्षा चालकाला चार ते पाच रिक्षा चालकांनी बेदम मारहाण केली. मुंब्रा पोलीस स्टेशनपासून काही अंतरावरच हाणामारीची ही घटना घडली. मारहाण झालेल्या रिक्षा चालकाने मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंब्रा येथील मिलेनियम पार्क येथे ही घटना घडली. चार ते पाच रिक्षा चालकांनी एका रिक्षाचालकाला मारहाण केली. या घटनेने एकच खळबळ उडाली. पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच ही हाणामारीची घटना घडली. एका रिक्षा चालकाचा अन्य रिक्षाचालकांशी वैयक्तिक कारणावरून वाद झाला. बाचाबाचीचं पर्यावसन हाणामारीत झालं. घटनेवेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेनंतर मुंब्रा पोलिसांत मारहाण झालेल्या रिक्षा चालकाचा जबाब नोंदवण्यात आला. पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत. ही घटना अंतर्गत वादामुळं झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी चार ते पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे यांची आज पुण्यात पहिली सभा

Onion Export: कांदा उत्पादक शेतकरी संकटात, बांग्लादेशने कांदा आयातीवर लावले निर्बंध| VIDEO

Amruta Khanvilkar : हॉटनेसचा तडका! अमृता खानविलकरचा लाल ड्रेसमध्ये किलर लूक, पाहा PHOTOS

Cricketer Death: भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सामन्यादरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका

Mumbai Local: पश्चिम रेल्वेवरील लोकल वेळेत धावणार, नवीन मार्गिकेचं काम पूर्ण; कधीपासून होणार सुरु?

SCROLL FOR NEXT