छत्रपती संभाजीनगर येथील अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांचं अपहरण झाल्याची घटना समोर आलीय. शिर्डीहून संगमनेरमार्गे नाशिककडे जाताना अपहरण झाल्याची तक्रार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलीय. झिरो नंबरने हा गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्याकडे वर्ग होणार आहे. उमेदवार राजू शिंदे यांचे सहकारी मंगेश जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. संगमनेर शहराजवळील समनापुर गावाजवळ घटना घडल्याची प्रथिमक माहिती हाती आलीय.
दरम्यान, अपक्ष उमेदवार यांची यावर प्रतिक्रिया आलीय. औरंगाबाद पूर्व मधून अपहरण तक्रार संगमनेर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. राजू शिंदे यांनीच आपलं कुठलंही अपहरण झालं नसून आपण संभाजीनगरला आपला अर्ज मागे घेण्यासाठी जात असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे कोणीही अफवा पसरू नये असं आवाहन अपक्ष उमेदवार अर्ज भरलेले राजू शिंदे यांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.