Pandharpur Wari saam tv
Video

Ashadhi Wari Video : पंढरीच्या वाटेतच भेटला विठ्ठल! अभंग, गवळण गात मायमाऊलींनी वारकऱ्यांसाठी बनवली पिठलं - भाकरी!

Pandharpur Wari : विठुरायाच्या भेटीसाठी वारकरी पंढरीकडे मार्गस्थ झालेला आहे. वारीत मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झाले आहेत. मायमाऊलींनी त्यांच्यासाठी खास पिठलं-भाकरीचं जेवण केलं आहे.

Nandkumar Joshi

सागर आव्हाड, इंदापूर

विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे. विठ्ठलाचं मनोहर रूप डोळ्यांत साठवण्यासाठी वारकरी आतूर झालाय. देशभरातली तसेच महाराष्ट्रातील वारकरी पंढरीकडं कूच करत आहे. आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन तर प्रत्येकाला होणारच आहे, पण त्याआधीच पंढरीच्या वाटेवर मायमाऊलींच्या रुपानं विठ्ठल भेटल्याची प्रचिती येत आहे. खरंतर वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना जेवण कसं मिळतं, कोण तयार करतं? शेकडोच्या संख्येने वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना जेवण कोण बनवून देतं, असा प्रश्न पडतोच. पण हा व्हिडिओ बघून त्याचं उत्तर नक्की मिळेल. संत गुलाब बाबा प्रासादिक दिंडीत सहभागी झालेल्या मायमाऊलींनी रस्त्याच्या कडेला थांबून वारकऱ्यांसाठी खास पिठलं भाकरी केलीय. अभंग, गवळण गात या वारकरी महिला इतर वारकऱ्यांसाठी स्वयंपाक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT