PCMC News Saam Tv News
Video

Video: वारकरी संप्रदाय समजून घेण्यासाठी वेशभूषा स्पर्धेचं आयोजन

अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करुन स्पर्धेच्या आयोजकांनी एक सुसंस्कारित पिढी घडवण्याचा काम हाती घेतला आहे. अशी भावना या स्पर्धेचे परीक्षक आणि पुरस्कार वितरकांनी व्यक्त केली.

Rachana Bhondave

पिंपरी चिंचवड शहरात शालेय विद्यार्थ्यांसाठी आषाढी वारीतील पारंपारिक वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. वारकरी संप्रदायातील संतांचे विचार आणि वारकऱ्यांचे आचार बालपणातच विद्यार्थ्यांच्या जीवनावर कोरले जावे या उद्देशाने ही स्पर्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी आणि पिंपरी चिंचवड सारथी ॲप आणि रिलायन्स स्मार्ट बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आटो क्लस्टर सेंटर येथे काल या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. या स्पर्धेत शाळकरी विद्यार्थ्यांनी ज्ञानोबा, तुकोबा, सोपान, मुक्ताबाई, नामदेव आणि एकनाथ महाराज तसेच विठ्ठल-रुक्माई यांची वेशभूषा धारण करून त्यांचे विचार लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळकरी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्मार्ट बाजारच्या वतीने या स्पर्धेतील वेगवेगळ्या वयोगटातील स्पर्धकांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशी पुरस्कार राशी वितरित केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माझ्या विजयाचं लीड ५ हजारांंपेक्षा जास्त असेल - श्रद्धा जाधव

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT