Salil Deshmukh News SaamTv
Video

Maharashtra Politics : या बड्या मंत्र्याचा पुत्र उतरणार निवडणूक रिंगणात; नाव आलं समोर

Amravati News : अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदारसंघात विधानसभेला नवा चेहरा देण्यासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आग्रही असल्याने सलील देशमुख यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Saam Tv

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सलील देशमुख हे अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

विधानसभेला नवा चेहरा देण्यासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आग्रही असल्याने पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव नवीन चेहरा म्हणून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांच्या विरोधात सलील देशमुख सामना होण्याची शक्यता आहे. वरुड मोर्शीत माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख आणि माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांच्या वादाचा सलील देशमुख यांना फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच हा मतदारसंघ काटोल मतदारसंघाला लागून असल्याने त्याचाही फायदा त्यांना होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT