Thackeray Sena Workers Protest at Matoshree saam tv
Video

तिकीट कापलं, ठाकरे सेनेविरोधात संताप; मातोश्रीबाहेर कार्यकर्त्यांचा राडा, VIDEO

BMC Election : मुंबईत ठाकरे बंधूंची युती झाली आहे. पण अनेकांना उमेदवारी नाकारल्यानं नाराजीचा फटका सहन करावा लागत आहे. तिकीट कापलं म्हणून ठाकरे सेनेविरोधात कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला असून, त्यांनी थेट मातोश्रीवरच धडक दिली.

Nandkumar Joshi

मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीतही एकत्र यावे अशी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य मुंबईकरांची इच्छा असल्याचं सुरुवातीला बोललं जात होतं. दोन्ही ठाकरे बंधूंनाही तसंच वाटलं. निवडणुकीची घोषणा झाली आणि दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. तशी घोषणाही केली. खरं तर मनसे आणि ठाकरे सेना एकत्र आल्यानंतर नाराजीनाट्य रंगणार नाही अशी अपेक्षा होती. पण उमेदवारांची नावं घोषित झाली, उमेदवारी अर्ज भऱण्याचा शेवटचा दिवस आला आणि नाराजीनाट्य उफाळलं. काही ठिकाणी मनसे, तर काही ठिकाणी ठाकरेंच्या सेनेला नाराजीचा सामना करावा लागला.

उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर तर ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. उमेदवारी अर्ज नाकारल्यानं इच्छुक कार्यकर्त्यांनी श्रद्धा जाधव यांच्याविरोधात संताप व्यक्त केला. आम्ही आता ऐकणार नाही. किती वर्षे झाली, श्रद्धा जाधव यांनाच उमेदवारी दिली जाते. आम्ही लेखी पत्र दिलं होतं. पण उमेदवारी त्यांनाच दिली जाते. इतकी वर्षे निष्ठा राखून काहीही फायदा नाही, अशा शब्दांत एका वयोवृद्ध महिला कार्यकर्त्यानं नाराजी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : नागपुरात पेट्रोल पंपावर दिसला वाघ; परिसरात भीतीचे वातावरण, व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar Plane Crash Mystery: दादांच्या अपघातावरून पुन्हा 'संशयकल्लोळ', अपघातापूर्वी बारामती विमानातळाची रेकी

एकनाथ शिंदे मोठा डाव टाकणार; कोणाच्या गळ्यात घालणार राज्यसभेची माळ? शेवटच्या क्षणापर्यंत संस्पेन्स

T20 WC 2026: टॉपर दक्षिण आफ्रिका पुन्हा 'चोकर्स'; न्यूझीलंडने दिमाखात गाठली फायनल, पाच पराभवांचा घेतला बदला

युद्धाचा भडका, शेतकऱ्यांना फटका; आखाती देशांमध्ये निर्यात महागली, VIDEO

SCROLL FOR NEXT