Ambarnath Anandacha Shidha News SaamTv
Video

Ambarnath News Update : कुणाच्या सांगण्यावरून 'आनंदाचा शिधा' काळ्या बाजारात ?

Anandacha Shidha : सामाजिक कार्यकर्त्यांनी काळ्या बाजारात विक्रीसाठी नेलं जाणार आनंदाच्या शिध्यातील खाद्यतेल रंगेहाथ पकडल्यानंतर शिधावाटप अधिकाऱ्यांकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिधावाटप अधिकाऱ्यांनी संबंधित रेशन दुकानही सील केलं आहे.

Saam Tv

राज्य सरकारकडून सण-उत्सवांच्या काळात प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या आनंदाच्या शिध्याची काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अंबरनाथमध्ये हा प्रकार उघड झाला असून सामाजिक कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर शिधावाटप अधिकाऱ्यांकडून अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शिधावाटप अधिकाऱ्यांनी संबंधित रेशन दुकानाची तपासणी करून या दुकानालाही सील ठोकलं आहे.

अंबरनाथच्या महालक्ष्मी नगर परिसरातील ४६ फ ००१ या रेशन दुकानात सरकारकडून आनंदाच्या शिध्याचं साहित्य आलं होतं. यापैकी सोयाबीन खाद्यतेलाच्या २७० लिटर तेलाच्या पिशव्या पहाटेच्या सुमारास एका खाजगी टेम्पोतून काळ्या बाजारात विक्रीसाठी नेल्या जात असल्याचं सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी आणि प्रशांत उतेकर यांच्या निदर्शनास आलं. त्यानुसार शिधावाटप अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन तपासणी केली असता हे सरकारतर्फे देण्यात आलेल्या आनंदाच्या शिध्यामधीलच तेल असल्याचं निष्पन्न झालं. हे तेल नेमकं कुणाच्या सांगण्यावरून आणि कुठे विक्रीसाठी नेलं जात होतं? याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास एक तास बैठक

Ration Card: रेशन कार्डधारकांना आता ४५० रुपयांत मिळणार सिलिंडर; कसं? जाणून घ्या

महाराष्ट्रावर अन् कलेवर प्रेम नसतं तर आता Prajakta Mali कुठे असती? स्वतः केला खुलासा, 'तो' व्हिडीओ चर्चेत

Sanjay Raut: हा निकाल असाच ठेवा, पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या; संजय राऊतांचं महायुतीला थेट आव्हान

PM Modi: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी PM मोदींचं नव्या खासदारांना आवाहन, म्हणाले...

SCROLL FOR NEXT