Maharashtra Coronavirus Cases SAAM TV
Video

Coronavirus : अमरावतीमध्ये कोरोनाचा शिरकाव, ५६ वर्षीय महिलेला लागण

Amravati Reports First COVID-19 Case: अमरावतीत ५६ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असून, हा शहरातील पहिला रुग्ण आहे. महिलेवर गृहविलगीकरणात उपचार सुरू असून प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Namdeo Kumbhar

Amravati Reports First COVID-19 Case: अमरावती शहरात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. महापालिका क्षेत्रातील 56 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये ती पॉझिटिव्ह आढळली. सध्या तिच्यावर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत. आरोग्य विभाग आणि महानगरपालिकेचे पथक या महिलेच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. कोरोनाच्या संभावित लाटेचा धोका टाळण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, रुग्णालयात दहा खाटांचा स्वतंत्र कोरोना वार्ड तयार करण्यात आला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी ही माहिती दिली. शहरवासीयांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT