Amit Shah wants to become Deputy Prime Minister  साम टीव्ही मराठी
Video

राजकारणात भूकंप! अमित शाहांना व्हायचंय उपपंतप्रधान, पण मोदींनी...; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut : अमित शाहांना तात्काळ उपपंतप्रधान व्हायचे असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची मागणी नाकारल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Namdeo Kumbhar

Amit Shah wants to become Deputy Prime Minister : अमित शह यांना तात्काळ उपपंतप्रधान व्हायचंय, पण पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या या मागणीलाच नकार दिला आहे, असा खळबळजनक दावा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊतांच्या या दाव्यानंतर देशातील राजकारणात खळबळ उडाली आहे. राऊतांचा दाव्यावर भाजपकडून तिखट प्रतिक्रिया येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खासदार संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या संसदेतील अनुपस्थितीवर बोट ठेवताना म्हटले की, "अमित शाह यांना संसदेत येण्यापासून कोणी रोखले आहे? मुळात अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये मतभेद आहेत, असा दावा राऊतांनी केलाय.

अमित शहांना देशाचं तात्काळ उपपंतप्रधान व्हायचं आहे आणि मोदींनी त्याला नकार दिलाय. ही माझी बातमी आहे. मला उपपंतप्रधान पदी ताबडतोब नवीन रचनेमध्ये घोषित करा, मी तुमचा वारसदार म्हणून मला घोषित करा, असे शाह म्हणाले. पण मोदींनी त्याला स्पष्ट नकार दिलेला आहे. हे जे मी सांगतो आहे, हे १०० टक्के सत्य आहे, असे संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात मराठा बांधव आक्रमक; जरांगेंच्या समर्थनार्थ पुण्यात मराठा समाजाचं आंदोलन

Liver disease symptoms: रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी अचानक ही 3 लक्षणं दिसली समजा लिव्हर खराब होतंय

Walking benefits : दररोज १०,००० पावलं चाला, ३० दिवसांत शरीरात हे बदल होतील?

Dates Benefits: रोज सकाळी रिकाम्या पोटी खा २ खजूर; शरीराला मिळतील 'हे' ७ जबरदस्त फायदे

Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, राऊतांचे नगरसेवकपद रदद्

SCROLL FOR NEXT