bharat gogawale saam tv
Video

Sunil Tatkare: लंच डिप्लोमसीमध्ये काय चर्चा झाली? सुनील तटकरेंनी सगळचं सांगितलं|VIDEO

Amit Shah’s Lunch with Tatkare : रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये, यावरून तटकरे आणि गोगावले यांच्यात वाद सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी जाऊन जेवणाचा आस्वाद घेतला. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Omkar Sonawane

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. अमित शहा यांच्या दौऱ्यामध्ये रायगडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह महायुतीतले अनेक नेते उपस्थित होते. यानंतर अमित शहा यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी जेवणासाठी गेले. यावेळी अमित शाहा यांच्यासोबत काय चर्चा झाली? पालकमंत्री पदावर नेमकं काय ठरलं? अशा प्रश्नांवर स्पष्टीकरण दिले.

सुनील तटकरे म्हणाले, माझे कर्तव्य होते, मी भरत गोगावले, उदय सामंत या सर्वांना निमंत्रित केले होते. पण गोगावले आले नाहीत, ते का आले नाहीत? हे मला माहित नाही पण मी माझे कर्तव्य केले. राजकारणा पलीकडे आणि एका विशिष्ट बाबींच्या पलीकडे सार्वजनिक जीवनामध्ये परस्परांचे संबंध राहिले पाहिजे, बाकी त्याबद्दल आणखी काही बोलणार नाही. आमित शाहा यांच्या भेटीदरम्यान कोणती राजकीय चर्चा झाली नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह सर्वांसोबत अगदी खेळीमेळीच्या वातावरणात संवाद होता. अमित शाहा यांची भेट कौटुंबिक होती. या भेटीत अमित शाहा यांच्याबरोबर मन मोकळेपणाने चर्चा झाली. तसेच अमित शाहा यांच्या जेवनात महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश होता. आमच्या विनंतीला मान देऊन अमित शाहा हे घरी आले. शाहा यांच्या उपस्थितीमध्ये स्नेह भोजनाचा कार्यक्रम झाला. शाहा यांच्या उपस्थितीमध्ये कौटुंबिक चर्चा झाली असेही तटकरे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akkalkot : दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान अक्क्लकोटचं श्री स्वामी मंदिर 20 तास खुलं राहणार | VIDEO

Education Justice : पुण्यात नामांकित कॉलेजने कागद पडताळणीसाठी केला उशीर, तरुणाची ब्रिटनमधली नोकरी गेली, नेमकं काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update : धनंजय मुंडे यांच्या भाषणानंतर करुणा मुंडे यांची प्रतिक्रिया

Bhaubeej Gift: अजून ठरलं नाही बहिणीसाठी गिफ्ट? पाहा भाऊबीजासाठी खास आणि ट्रेंडी गिफ्ट Ideas

Gold Rate: धनत्रयोदशीला सुवर्णनगरीत सोनं स्वस्त; ३००० रुपयांची घसरण, ग्राहकांची गर्दीच गर्दी

SCROLL FOR NEXT