Three leopards spotted inside the courtyard of a house in Ambegaon, sparking panic among local residents. Saam Tv
Video

बिबट्यांचा धुमाकूळ; घराच्या अंगणात एक, दोन नव्हे तर तीन बिबटे|VIDEO

Leopard Scare In Ambegaon: आंबेगाव तालुक्यात कवलीमळा आणि अवसरी खुर्द येथे बिबट्यांचा वावर पुन्हा वाढला असून एका घराच्या अंगणात तीन बिबट्यांनी प्रवेश केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Omkar Sonawane

पुणे: आंबेगाव तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्यांचा धुमाकूळ सुरू झाला असून कवलीमळा आणि अवसरी खुर्द परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री तीनच्या सुमारास रवींद्र वाळके यांच्या घराच्या आवारात तब्बल तीन बिबट्यांनी प्रवेश केला. नवीन घराच्या पोर्चमध्ये आणि जुन्या घरासमोर सुमारे दोन ते तीन मिनिटे थांबून हे बिबटे परत निघून गेले. या भागात यापूर्वीही बिबट्यांचा वावर होता, मात्र आता परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांत कवलीमळा परिसरात एकही कुत्रा शिल्लक नसल्याची माहिती मिळते, तर दोन ते तीन महिन्यांपूर्वी भरत वसंत भोर यांच्या वासरावरही हल्ला झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricketer Death: भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सामन्यादरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका

Maharashtra Live News Update: पुण्यातील प्रभाग ९ चे राजकारण तापणार!

Mumbai Local: पश्चिम रेल्वेवरील लोकल वेळेत धावणार, नवीन मार्गिकेचं काम पूर्ण; कधीपासून होणार सुरु?

Bollywood Breakup: तारा आणि वीरनंतर बी-टाऊनच्या आणखी एका कपलचं ब्रेकअप; दोन वर्षाचं रिलेशन तुटलं...

Baba Vanga: बाबा वेंगांनी सांगितली 2026 मधली तिसऱ्या महायुद्धापासून एलियन्सपर्यंतची भाकीतं

SCROLL FOR NEXT