Ambadas Danve News SaamTv
Video

VIDEO : 'भर अब्दुल्ला गूड थैली में'; अंबादास दानवेंची सरकारवर गंभीर टीका

Ambadas Danve : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष असलेल्या संस्थेला अत्यल्प दरात भूखंड देण्याचं प्रकरण ताजं असतानाच अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर आणखीन एक आरोप केला आहे.

Saam Tv

राज्यातील 30 एमआयडीसी रिसॉर्टच्या इमारती आणि मोकळ्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष असलेल्या संस्थेला अत्यल्प दरात भूखंड देण्याचे प्रकरण अजूनही ताजे आहे. असे असतानाच अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर हा दुसरा गंभीर आरोप केला आहे. या संदर्भातील यादीच त्यांनी जाहीर केली आहे. यासंदर्भातील एक ट्विट त्यांनी आपल्या सोशल मिडियावरून शेअर केलं आहे.

या संदर्भात अंबादास दानवे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये राज्य सरकार आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. या खासगीकरणामुळे एकूण 200 मराठी अधिकारी - कर्मचारी यांच्या नोकऱ्या शासन खाणार असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. जागतिक पर्यटन दिनीच भूखंड माफियांना सरकारने देऊ केलेले हे दिवाळीचे फटाके असल्याचा आरोप देखील दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT