Ashok Kharat Case  Saam tv
Video

Ashok Kharat: भोंदू अशोक खरातच्या संपर्कातील तो लोकप्रतिनिधी कोण? गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

Sinnar leader allegations: सिन्नरमधील लोकप्रतिनिधीवर मतदान यंत्रांच्या सुरक्षेसाठी जादूटोणा केल्याचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा गंभीर आरोप करण्यात आलाय. या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सिन्नरमधील एका लोकप्रतिनिधीचा भोंदू अशोक खरात याच्याशी संपर्क असल्याचा गंभीर आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. निवडणुकीनंतर नाशिकच्या अंबडमध्ये ठेवण्यात आलेल्या मतदान यंत्रांच्या सुरक्षेसाठी या लोकप्रतिनिधीने जादूटोणा केल्याचा धक्कादायक दावा देखील करण्यात आला आहे. दुसऱ्या उमेदवाराने आपल्या मतदान यंत्रांवर कोणी जादूटोणा करून मतांमध्ये फेरफार करू नये, यासाठी खासगी सुरक्षा रक्षक नेमल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे या प्रकरणाला आणखीच वेगळं वळण मिळालं आहे.

याशिवाय, भोंदू अशोक खरात हा १९९९ पासून या लोकप्रतिनिधीच्या प्रचारात एक्टिव्ह असल्याचा आरोपही अंनिसने केला आहे. या सर्व आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीये. यामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावं, अशी ठाम मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपा किसान मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

Property Tax Hike : मालमत्ता करात मोठी वाढ! घर खरेदी-विक्रीही महागणार; जाणून घ्या A to Z माहिती

SCROLL FOR NEXT