Akola emergency team mobile recovery Saam Tv
Video

नाद करा, पण शेतकऱ्याचा कुठं! आयफोन विहिरीत पडला, २२ तास रेस्क्यू ऑपरेशन | VIDEO

Akola Rescue Team Recovers Mobile Phone: अकोला येथील आपत्कालीन पथकाने येळवण गावातील शेतकऱ्याच्या विहिरीत पडलेल्या महागड्या मोबाईल फोनसाठी 22 तासांच्या अथक शोधानंतर मोबाईल वाचवला. स्कुबा डायव्हिंग तज्ज्ञाच्या साहाय्याने ही मोहीम यशस्वी झाली.

Omkar Sonawane

अकोला : आपण सर्वांनी शोध व बचाव आपत्कालीन पथकाबद्दल ऐकलंये. अपघात असो की पूरस्थिती बचाव कार्यासाठी दाखल होतं ते आपत्कालीन पथकचं. पण हेचं तुम्हा सर्वांना सांगण्याचं कारण की अकोल्यातल्या एका आपत्कालीन पथकानं राबविलेलं शोधकार्य चांगलचं चर्चेत आलंय. त्यांची 'रेस्क्यू ऑपरेशन अर्थातच शोध मोहीम' आज सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय. ही रेस्क्यू मोहीम होती विहिरीत पडलेल्या एका महागड्या मोबाईल फोन'च्या शोधकार्यसाठी. या बचाव पथकान विहिरीतल्या 40 फूट खोल पाण्यात शोधकार्य सुरू केलं, आणि 22 तासाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर विहिरीत पडलेला मोबाईल तसाच सुखरूप हाती लागला. ही गोष्ट आहेय अकोला शहरा लगत असलेल्या येळवण गावातील. पाहूयात !

येळवण गावातील पप्पू मोहोड यांच्या शेतातील हिच ती विहीर. साधारणतः 50 फूट खोल आणि 40 फूटापर्यत पाण्याने भरलेली. मोहड फुल शेतीला पाणी देत असतानाच अचानकपणे खिशातील 'मोबाईल फोन' विहिरीत पडला. त्यांचा मोबाईल हा महागडा होता खरीच, पण त्यामध्ये महत्वाचा डाटा, कॉन्टॅक्ट आणि नातेवाईकांसोबत रमलेल्या काही आठवणी. याच गोष्टीच त्यांनी टेन्शन घेतलं. आणि थेट आपत्कालीन पथकालाच संपर्क साधला. थोड्यावेळतच पिंजर येथील संत गाडगेबाबा शोध व बचाव आपत्कालीन पथक येळवण गावात दाखल झालं. आणि मोबाईल फोन'च्या शोधार्थ सर्च मोहीम सुरू झाली.

22 तासानंतर आपत्कालीन पथकाला यश.

शोध पथकातील पाच जणांकडून दिवसभर विहिरीतील पाण्याच्या तळाशी जात वारंवार प्रयत्न सुरूच होते. मात्र, मोहड यांची विहीर तुडुंब भरलेली. त्यामुळं अनेक अडचणी येत होते. जास्त खोलवर पाणी असल्याने मोबाईल फोनचा शोध घेणं अवघड झालं. पुढं रात्रभरच्या अथक प्रयत्नांनंतर पहाटे 6 वाजता 'स्कुबा डायव्हिंग कीट' बोलावली, आणि अंडर वाॅटर स्कुबा डायव्हिंग स्विमर असलेला 'अंकुश सदाफळे हा तळाशी गेला. अखेर त्याच्या अथक परिश्रमाला यश आलं. आणि मोहोड यांचा महागडा मोबाईल फोन विहिरीच्या बाहेर काढला. विशेष म्हणजे आयफोन अर्थातच एप्पल कंपनीचा फोन मोबाईल चार दिवस विहिरीतल्या पाण्यात होता. त्यानंतर देखील मोबाईल चालू स्थितीत दिसून आलाय, त्यामुळे मोबाईल मालकाचा आनंद गगनात मावेनासा झाला. या शोधकार्यासाठी साधारणतः 22 तास या संत गाडगेबाबा शोध व बचाव आपत्कालीन पथकाला येथे द्यावे लागले.

या लोकांनी घेतलं परिश्रम..

आपत्कालीन पथकाचे प्रमुख तथा जिवरक्षक दिपक सदाफळे, त्यांचे सहकारी शेखर केवट, अंकुश सदाफळे, निलेश खंडारे, विकास सदांशिव, मयुर सळेदार, ऋषीकेश राखोंडे, सार्थक वानखडे, हर्षल वानखडे, गणेश लेहनकार, सुरज खंडारे, योगेश कुदळे या लोकांनी मोबाईल शोध कार्यासाठी परिश्रम घेतलं. त्यांचा शाल श्रीफळ देत मोबाईल मालकानं सत्कार केला. विशेष म्हणजे हे संपूर्ण शोध कार्य त्यांनी निशुल्क केले. आज त्यांच्या या आगळ्यावेगळ्या शोध मोहीमची सर्वत्र चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : मोबाईल विहिरीत पडला; अकोल्यातील पठ्ठ्याने अख्खी यंत्रणा कामाला लावली, नेमकं काय घडलं? VIDEO

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

Jeans: जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

Asia Cup: चक्क दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

Fatty Liver: फॅटी लिव्हर रोखण्यासाठी दररोजच्या जीवनात करा 'या' सोप्या गोष्टी

SCROLL FOR NEXT