INDIA Aghadi Protest Saam Tv News
Video

INDIA आघाडीला पोलिसांनी अडवलं, राहुल गांधी आक्रमक, थेट बॅरेगेडिंग तोडण्याचा प्रयत्न; पाहा VIDEO

INDIA Aghadi Protest: राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ३०० खासदारांनी दिल्लीमध्ये मोर्चा काढला. संसद भवनाजवळ पोलिसांनी मोर्चा अडवल्याने तणाव निर्माण झाला. राहुल गांधींकडून थेट बॅरेगेडिंग तोडण्याचा प्रयत्न.

Bhagyashree Kamble

  • राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ३०० खासदारांनी दिल्लीमध्ये मोर्चा काढला.

  • संसद भवनाजवळ पोलिसांनी मोर्चा अडवल्याने तणाव निर्माण झाला.

  • अखिलेश यादव यांनी बॅरिगेटवरून उडी घेतली, महिला खासदारही आक्रमक झाल्या.

  • मोर्चाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंडिया आघाडीच्या वतीनं ३०० खासदारांनी दिल्लीत मोर्चा काढण्यास सुरूवात केली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात संसद भवनापासून खासदारांनी आयोगाविरूद्ध धडक मोर्चा काढण्यास सुरूवात केली. मात्र, मोर्चाला सुरूवात झाल्यानंतर लगेच संसदेच्या गेटजवळ पोलिसांनी खासदारांना अडवलं. पोलिसांनी मोर्चा रोखताच ३०० खासदार आक्रमक झाले. सपा नेते अखिलेश यादव यांनी बॅरिगेटिंगवरून उडी घेतली. यावेळी महिला खासदारही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, इंडिया आघाडीचा मोर्चा पोलिसांना अडवल्यानंतर राहुल गांधी यांना बॅरिगेटिंग तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यासोबत इतर नेत्यांनीही बॅरिगेडिंग तोडण्याचा प्रयत्न केला. ही दृष्य कॅमेऱ्यात कैद झाली असून, सध्या याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पोलिसांना मोर्चाला अडवल्यानंतर ३०० खासदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT