Ajit Pawar SaamTv
Video

Ajit Pawar Oath Taking : सिक्सर! अजित पवारांनी सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ | VIDEO

Mahayuti Oath Taking Ceremony : महायुती सरकारने आज नवीन सरकार स्थापन केलं आहे. यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून यावेळी शपथ घेतली आहे.

Saam Tv

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालानंतर 13 दिवसांनी अखेर आज नवीन सरकार स्थापन होत आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडत असून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली तर एकनाथ शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली.

विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर 11 दिवसांनी महायुतीने काल सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांकडे दखल केला होता. त्यानंतर आज शपथविधी सोहळा होऊन महायुतीचं नवं सरकार स्थापन झालं आहे. निकालानंतर चाललेल्या नाराजी नाट्यानंतर अखेर आज नवीन सरकारची स्थापना झाली आहे. यात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

SCROLL FOR NEXT