Women in Beed demand roads over Ladki Bahin Yojana during Ajit Pawar’s visit Saam Tv
Video

Ajit Pawar: अजित पवारांना महिलांचा वेढा; आम्हाला 1500 रुपये नको, रस्ता द्या|VIDEO

Ladki Bahin Yojana: बीडच्या शिरूर तालुक्यातील खोकर मोहा गावात महिलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेराव घालत लाडकी बहीण योजनेऐवजी रस्त्याची मागणी केली.

Omkar Sonawane

बीड : शिरूर तालुक्यातील खोकर मोहा गावातील महिलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीदरम्यान रस्त्याचा प्रश्न थेट त्यांच्या समोर मांडला. गावात अनेक वर्षांपासून रस्ता नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

अजित पवार गावात आल्यानंतर महिलांनी त्यांना घेराव घालत तात्काळ रस्ता करून देण्याची मागणी केली. पवारांनी निवेदन स्वीकारत महिलांना विचारलं की, “लाडकी बहिण योजनेचा लाभ तुम्हाला मिळतो का?” यावर महिलांनी ठामपणे उत्तर दिलं, आम्हाला लाडकी बहीण योजनेपेक्षा रस्ता हवा आहे.

यावर पवारांनी मिश्किल टिपणी करत विचारलं, “मग लाडकी बहीण बंद करू का?” यामुळे उपस्थित ठिकाणी एकच हास्यकल्लोळ झाला. मात्र लगेचच त्यांनी गंभीर होत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आणि “तात्काळ गावात रस्ता झाला पाहिजे” अशा स्पष्ट सूचना दिल्या. तो रस्ता आता किती दिवसात होतो हे पाहण महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI Coach: मुंबई इंडियन्सला मिळला नवीन कोच; 'या' अनुभवी खेळाडूवर संघाची जबाबदारी

Election Commission: मतमोजणीच्या नियमात बदल, निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय

Sambhaji Bhide: दांडिया खेळणं म्हणजे नपुंसकता; संभाजी भिडेंच्या वक्तव्याने महाराष्ट्रात पेटला वाद

Rahul Gandhi : तुम्ही घाबरु नका, काँग्रेस तुमच्या सोबत; मामा पगारेंना थेट राहुल गांधींचा फोन, VIDEO

Farmers in Marathwada: आभाळाचं क्रूर रूप! अतिवृष्टीने पिकं आणि आशा दोन्ही वाहून घेतली,बळीराज्याने फोडला टाहो

SCROLL FOR NEXT