Devendra Bhuyar News SaamTv
Video

VIDEO : अजितदादांचा आमदार बरळला, मुलींच्या लग्नाबद्दल वादग्रस्त वक्तव्य

MLA Devendra Bhuyar : मोर्शी वरुड मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी एका कार्यक्रमात मुलींच्या लग्नावर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Saam Tv

मोर्शी वरुड मतदारसंघाचे अजित पवार यांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांना अनुसरून वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 'मुलगी जर पाहायला चांगली असेल तर ती तुमच्या माझ्या सारख्याना भेटत नाही ती नोकरीवाल्या मुलाला भेटते. दोन नंबरची मुलगी डोंबली मुलगी पानटपरीवाल्याला, किराणा दुकानदाराला दिली जाते. तर तीन नंबरचा गाळ हेबडली हाबडली पोरगी शेतकऱ्याच्या मुलांना मिळते.' असं महिलांच्या दिसण्यावरून आमदार देवेंद्र भुयार यांनी हे वादग्रस्त वक्तव्य एका कार्यक्रमात केलं आहे.

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार हे अजित पवार यांचे समर्थक आहेत. त्यांनी महिलांच्या लग्नाबद्दल केलेलं एक वादग्रस्त वक्तव्य सध्या चर्चेत आहे. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ''दिसायला चांगली असलेली मुलगी ही नोकरीवाल्या मुलांना मिळते. तर दोन नंबरची डोंबली मुलगी पानटपरीवाल्याला किंवा किराणा दुकानदाराला भेटते आणि तीन नंबरचा उरलेला सगळा गाळ हा शेतकऱ्याच्या मुलांना मिळतो. म्हणजे शेतकऱ्याच्या मुलांचं काही खर राहिलेल नाही. जन्माला येणारं लेकरूसुद्धा हेबाळ निघतं. माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी वाणराचे पिल्लू असाच कार्यक्रम आहे सगळा..'' असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे. त्यामुळे आता त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BP Measurement Tips: ब्लड प्रेशर घरी तपासण्याची योग्य पद्धत कोणती? डॉक्टरांनी दिली सर्वात महत्वाची माहिती

Maharashtra Live News Update: जळगावातील जिल्हा न्यायालयात बुलेटने अचानक पेट घेतला

Kajuchi Bhaji Recipe: कोकणी स्टाईल ओल्या काजूची भाजी कशी बनवायची? पारंपारिक रेसिपी वाचा

Rain Alert: विदर्भ- मराठवाड्यासाठी ७२ तास महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Kavya Maran trolling: सनरायझर्सचा निर्णय वादात; अबरार अहमदला खरेदी केल्याने काव्या मारन ट्रोल, सोशल मीडिया अकाऊंटही सस्पेंड

SCROLL FOR NEXT