Ajit Pawar and Rohit Pawar during a joint political event in Pimpri-Chinchwad, marking their first appearance together after the NCP split. Saam Tv
Video

राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर दोन्ही काका पुतणे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर, भाजपवर तोफ डागणार? VIDEO

Ajit Pawar And Rohit Pawar First Joint Rally After NCP Split: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार आणि रोहित पवार एका व्यासपीठावर एकत्र आले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील संयुक्त सभेतून भाजपवर जोरदार टीका होण्याची शक्यता आहे.

Omkar Sonawane

पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार आणि रोहित पवार हे एका व्यासपीठावर एकत्र आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये युती झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 32 येथे हा संयुक्त कार्यक्रम पार पडणार आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा थेट सामना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि रोहित पवार यांच्या एकत्र उपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

संयुक्त व्यासपीठावरून दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपवर जोरदार टीका करण्याचे संकेत दिले. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दाखवत भाजपला सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न या सभेतून करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather update: देशावर यंदा दुष्काळाचं सावट,जागतिक हवामान संघटनेच्या अंदाजानं शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं

Fact Check: खरंच सरकारनं गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद केला? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य

Maharashtra Live News Update: श्रीरामपूरमध्ये हॉटेलवर छापा; घरगुती गॅस सिलिंडरचा गैरवापर उघड, 10 सिलिंडर जप्त

ICC Ranking : टी २० रँकिंगमध्ये वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारताचा दबदबा; संजू सॅमसननं घेतली मोठी झेप, टॉप १० मध्ये कोण-कोण?

Solapur Crime: सूनेमुळे सासऱ्यानं संपवलं जीवन; तपासात समोर आलं धक्कादायक कारण

SCROLL FOR NEXT