Pankaj Bhujbal SaamTv
Video

Pankaj Bhujbal : पंकज भुजबळ यांनी घेतली आमदारकीची शपथ; नांदगावमधून विधानसभेसाठी होते इच्छुक

Saam Tv

राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी 7 जागांसाठी उमेदवारांची नावे राज्यपालांकडे पाठवल्यानंतर मंगळवारी दुपारी या आमदारांचा शपथविधी पार पडला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि सांगली-मिरज-कुपवाडचे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांना संधी मिळाली आहे. तर शिवसेनेने हेमंत पाटील आणि मनिषा कायंदे यांची वर्णी लागली आहे.

मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ हे 2009 आणि 2014 मध्ये नाशिक जिल्ह्यातील नांदगावमधून विधानसभेवर गेले होते. 2019 मध्ये मात्र त्यांना हॅट्रीक साधता आली नाही. शिवसेनेचे सुहास कांदे यांनी त्यांचा पराभव केला होता. यंदाच्या विधानसभेला पंकज भुजबळ यांची नांदगावमधून लढण्यास इच्छुक आहेत. पण ही जागा शिवसेनेकडे असल्यामुळे भुजबळ यांची विधान परिषदेवर वर्णी लावण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

Maharashtra Assembly Election : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, गिरीश महाजन यांचा विश्वासू नेता तुतारीच्या वाटेवर

Rishabh Pant: शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्यालाच दुखापत, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला मुकणार पंत? BCCI ने दिली महत्त्वाची अपडेट

Assembly Election 2024: '५१, ००० रुपये द्या अन् आमदारकीचे तिकीट घ्या...', पक्षाने ठेवली अजब अट; इच्छुकांची कोंडी

SCROLL FOR NEXT