Ajit Pawar Latest News  saam tv
Video

Ajit Pawar News : अजित पवारांची बारामतीतून माघार?, बघा काय म्हणाले?

Ajit Pawar On Baramati : अजित पवार हे बारामतीतून विधानसभा निवडणूक लढणार का? त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते दुसरा कोणता उमेदवार देणार का? याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.

Saam Tv

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा बारामती विधानसभा मतदारसंघातून माघार घेणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. बारामतीमध्ये बूथ कमिटी कार्यकर्ता मेळाव्यात बोलत असताना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं. यंदाच्या वेळेस मी जो उमेदवार देईल त्याला तुम्ही निवडून आणायचं आहे. तो कसा निवडून द्यायचा आहे, ते तुम्ही ठरवायचं आहे, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावर शरद पवार यांच्याकडे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केली असता, ते अजून पुनरावृत्ती करणार आहेत का, असा खोचक टोला शरद पवार यांनी अजित पवार यांना लगावला. दरम्यान, अजित पवार नेमकी कुणाला उमेदवारी देणार? लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार का? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३ लाख ५१ हजार शेतकरी पात्र, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

SCROLL FOR NEXT