ajit pawar funny statement saam tv
Video

Ajit Pawar : 'महायुतीच्या बातम्या नीट द्या, नाहीतर एकेकाला उडवेन', अजित पवारांचे मिश्किल विधान

Ajit Pawar Statement : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी हातांमध्ये एके ४७ बंदुका घेतल्या. तेवढ्यात अजित पवार यांनी मिश्किल टिप्पणी केली. त्यांच्या बोलण्यानंतर तेथे एकच हशा पिकला.

Yash Shirke

Ajit Pawar : 'महायुतीच्या नीट बातम्या द्या नाहीतर सगळ्यांना आम्ही दोघे उडवून टाकू', अशी मिश्किल टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

आज पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनेक विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले होते. यादरम्यान त्यांनी चाकणच्या निबे उद्योग समूहाला भेट दिली. तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांनीही हातांमध्ये एके ४७ बंदूका घेतल्या. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी बंदूकीने नेम लावण्याचा प्रयत्न केला. तर अजित पवारांनी जमलेल्या पत्रकारांकडे बंदूक धरली आणि 'महायुतीच्या नीट बातम्या द्या नाहीतर एकेकाला आम्ही दोघे उडवू' असे अजित पवार मिश्किलपणे म्हणाले. त्यांच्या या विधानाने तेथे जमलेले सर्वजण मोठ्याने हसले. त्यानंतर हसत हसत पवार यांनी 'आता हे पत्रकार एवढंच छापणार' असे विधान देखील केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: विद्यार्थ्यांना घेऊन जणारी बस दरीत कोसळली, २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

'सिनेमॅटिक' रिलवरून वाद पेटला; चमकेश तहसीलदार प्रतीक्षा तेजनकरांच्या निलंबनाची मागणी

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

SCROLL FOR NEXT