अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधानसभेच्या उमेदवारीवरून चांगलीच रस्सीखेच बघायला मिळत आहे. 'आम्हाला संधी द्या, अन्यथा आम्ही शरद पवार यांच्याकडे परत जाऊ.' असा इशारा काही आमदारांनी अजितदादांना दिल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.
बुधवारी मुंबईमधल्या अजित पवार यांच्या पक्ष कार्यालयात विधानसभा आणि महामंडळासाठी इच्छुक उमेदवारांशी संवाद साधण्यात येणार आहे. यासाठी अजित पवार पुण्यातून थेट मुंबईच्या कार्यालयात दाखल झाले आहे. राष्ट्रवादीमधून विधानसभेसाठी 400 कार्यकर्ते इच्छुक असल्याचं समजत आहे. आता अजितदादांच्या पक्षाला महायुतीत किती जागा मिळणार आणि त्यात दादा कोणाकोणाला संधी देणार यावर पुढचं चित्र ठरणार आहे. मात्र अजित पवार यांचे आमदार शरद पवार यांच्या गटात परत गेल्यास विधानसभेचे राजकीय चित्र बदलण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.