Ajit Pawar SAAM TV
Video

Ajit Pawar : करमाळ्यातील संगोबा गावाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट | VIDEO

Karmala Taluka flood : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी करमाळा तालुक्यातील कोर्टी आणि संगोबा या दोन गावांना भेट देऊन पूरस्थितीची पाहणी केली. करमाळा व परांडा तालुक्यांना जोडणाऱ्या सीना नदीवरील बंधाऱ्याची उंची वाढवण्याचे आदेश अजित पवारांनी दिले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी करमाळा तालुक्यातील कोर्टी आणि संगोबा या दोन गावांना भेट देऊन पूरस्थितीची पाहणी केली. कोर्टीनंतर त्यांनी सीना नदीकाठच्या संगोबा गावाला भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी करमाळा व परांडा तालुक्यांना जोडणाऱ्या सीना नदीवरील बंधाऱ्याची उंची वाढवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

शेतीत साचलेल्या पाण्यामुळे पंचनामे तात्काळ करणे अवघड असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र पाणी पाणी कमी झाल्यानंतर तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. याबाबत त्यांनी विमा पाटबंधारे विभागाचे अधिकारी श्री. राहणे यांच्याशी मोबाईलवरून चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या आहेत.

तसेच, राज्य सरकारने मागील अवकाळी पावसाच्या नुकसानीसाठी 2200 कोटी रुपये मंजूर केले असून हे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. अलीकडच्या दोन-तीन दिवसांमध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाणार आहे. या भेटीदरम्यान अजित पवार यांनी स्थानिक शेतकरी आणि दूध उत्पादकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT