Ajit Pawar expresses his concerns during the NCP meeting in Mumbai. Saam Tv
Video

Maharashtra Politics: अजित पवार छगन भुजबळांवर नाराज, नेमकं काय घडलं बैठकीत? VIDEO

Ajit Pawar Expresses Discontent with Chhagan Bhujbal: मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्याशी नाराजी व्यक्त केली आहे.

Omkar Sonawane

मुंबई: राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी छगन भुजबळ यांच्या समोरच नाराजी व्यक्त केली. यावेळी अजित पवारांनी बैठकीत सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यात राजकीय परिस्थिती वेगळी आहे. युतीबाबत स्थानिक स्तरावर निर्णय घेणे गरजेचे आहे. सध्या राज्याची आर्थिक स्थिती फार भक्कम नसली तरी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पॅकेज जाहीर केले आहे. विरोधकांच्या आरोपांवरून आपण थांबणार नाही, आपले सरकार काम करत आहे हे जनतेपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. साथीच्या चर्चेत त्यांनी पुढील आठवड्यात जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंबंधी अधिक चर्चा करणार असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे, बैठक दरम्यान अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या समोरच थेट नाराजी व्यक्त केली. भुजबळ यांनी आझाद मैदानावर मराठा जीआरबाबत मांडलेली भूमिकेवर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात, ज्यामुळे पक्षाची प्रतिमा धोक्यात येते आणि पक्षाला किंमत मोजावी लागते. असे अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : जैतोबा महाराज यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा

Government Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी कंपनीत नोकरी; ११८० पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Dharangaon : आश्रम शाळेतील १५ हून अधिक विद्यार्थ्यांना गोवरची लागण; धरणगाव तालुक्यात खळबळ, आरोग्य यंत्रणा नजर ठेवून

Divorce Celebration : माय लाइफ माय रूल! दुग्धाभिषेक केला, सूट बूट घालून केक कापला; घटस्फोटानंतर तरुणाचं जंगी सेलिब्रेशन | Video

Akshay Shinde Encounter: बदलापूर लैंगिक अत्याचाराचा मुख्य आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मोठी अपडेट|VIDEO

SCROLL FOR NEXT