Ajit Pawar News SaamTv
Video

Ajit Pawar News : शर्मिला पवारांचे आरोप धांतात खोटे, अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण | Marathi News

Maharashtra Assembly Elections : शर्मिला पवार यांनी केलेल्या आरोपात काहीही तथ्य नसून हे आरोप खोटे असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटलं आहे.

Saam Tv

शर्मिला पवार यांनी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारण्याची धमकी दिली आहे. यावर अजित पवार यांनी बारामती शहरातील बालकमंदिर या ठिकाणच्या निवडणूक केंद्राला भेट देऊन प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत. ते निवडणूक अधिकारी तपासतील. अशा पद्धतीचं आमच्या कार्यकर्त्यांनी कधी वक्तव्य केलेले नाही. आम्ही सुसंस्कृत फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात असून माझा आमच्या कार्यकर्त्यांवर पूर्ण ठाम विश्वास आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली तर पोलीस त्याची चौकशी करतील काय खरे आहे काय खोटे आहे ते पाहतील. तक्रार कोणीही करेल मात्र त्यात त्या असेल तर कारवाई होईल उलट माझ्याच कार्यकर्त्याला बॉलिंग एजंटला मतदान केंद्रातून बाहेर काढले हा अधिकार त्यांना नसून तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला आहे.

मतदानात करते वेळी स्लीपवर चिन्ह दिलेले असते ते फाडून स्लिप आतमध्ये घेऊन जावे लागते. हे सर्वांना माहित आहे. एक वाजून गेल्या तरी मतदानाच्या आकडेवारी कमी आहे. मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता जो योग्य उमेदवार वाटले त्याला मतदान करा, असे आवाहनही अजित पवार यांनी केलेय.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT