india on High Alert after operation sindoor saam tv
Video

जमीन, आकाश असो वा पाणी...पाकिस्तानची नांगी ठेचणार; भारतानं शपथच घेतली, यंत्रणा अलर्टवर, VIDEO

India on High Alert : पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं जणू चंगच बांधला आहे. दहशतवाद आणि दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला अद्दल घडवायचीच, अशी शपथच घेतली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेला पाकिस्तान वेडेवाकडे पाऊल उचलू शकतो. त्याआधीच नांग्या ठेचण्याचा प्लान भारतानं आखलाय. जमीन, पाणी असो वा आकाश सर्वत्र सुरक्षा वाढवलीय.

Nandkumar Joshi

भारतानं ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल्ल केलं. पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. यात शंभरहून अधिक दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला जात आहे. हा आकडा अधिक असू शकतो. दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानची यामुळं घाबरगुंडी उडाली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतानं आता ऑपरेशन २.० सुरू केल्याचं दिसतंय. हवाई हल्ल्यात पाकिस्तानस्थित नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तान पुरता बिथरला आहे. त्यात पाकिस्तानी नेत्यांकडून भारताला धमक्याही दिल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतानं मोठं पाऊल उचललं आहे.

जमीन असो, समुद्र असो की आकाश...सगळीकडची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत. अरबी समुद्रात युद्धनौका तैनात करण्यात आल्यात. भारतीय हवाई दलाची लढाऊ विमानं गस्त घालत आहेत. देशाच्या अण्वस्त्र साठ्याचं व्यवस्थापन करणाऱ्या यंत्रणेला अलर्टवर ठेवण्यात आलंय. पाकिस्तानच्या कोणत्याही चुकीच्या कृतीला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सशस्त्र दल सज्ज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला अटक, मनसे कार्यकर्त्यांनी शोधून काढत दिला चोप; पाहा VIDEO

Kalyan News: मराठी तरुणीला मारहाण करणारा परप्रांतीय अट्टल गुन्हेगार; आरोपीच्या शोधासाठी पोलिसांच्या ५ टीम तयार

Maharashtra Politics: ठाकरेंना रोखण्यासाठी फडणवीसांचं मायक्रोप्लॅनिंग,ठाकरेंचा डाव भाजप कसा उलटवणार ?

Beed Crime: वाल्मीक कराड जेलमध्ये... तरी गँग अ‍ॅक्टिव्ह! सहकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, आमदारांना धमक्या आणि शिवीगाळ|VIDEO

Mumbai Local Train: मुंबई-कसारा लोकल ट्रेनवर दरड कोसळली; दोन प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT