Govinda Health Update SaamTv
Video

Govinda News Update : ''नमस्कार, प्रणाम.. मी गोविंदा..''; गोविंदानेच सांगितला गोळी लागल्याचा घटनाक्रम

Saam Tv

''नमस्कार, प्रणाम.. मी गोविंदा आहे... तुमच्या प्रार्थनेबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.'' असं म्हणत अभिनेता गोविंदा याने स्वत: आपल्या चाहत्यांना तब्बेतीची माहिती दिली आहे. त्याचं ऑडिओ क्लिप त्याने आपल्या चाहत्यांसाठी तयार केलं आहे.

अभिनेता गोविंदा याच्या पायाला गोळी लागल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. स्वतःकडील बंदुक साफ करत असताना अनावधानाने स्ट्रीगर दबला गेल्याने बंदुकीतून गोळी सुटून त्याच्या पायाला लागल्याची घटना घडली होती. गोळी लागल्याने गोविंदाच्या पायाला गंभीर दुखापतही झाली. गोविंदाला उपचारासाठी जखमी अवस्थेत क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याच्या पायावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. गोविंदाला गोळी लागल्याचे वृत्त कळताच त्याचे चाहते चिंतेत आले होते. तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी चाहत्यांनी प्रार्थना केली होती. त्यानंतर आता अभिनेता गोविंदा याने स्वत: गोळी लागण्याची आपबीती ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना सांगितली आहे. तसेच आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचं देखील त्याने सांगितल आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

गोविंदा याने शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये म्हंटलं आहे की, '' नमस्कार, प्रणाम.. मी गोविंदा आहे... तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने, माझ्या आई-वडिलांच्या आणि गुरूंच्या कृपेने मी बरा आहे. मला एक गोळी लागली होती, पण आता ती काढण्यात आली आहे. मी इथले डॉक्टर अग्रवाल आणि त्यांच्या टीमचे आभार मानतो. तसच तुम्ही केलेल्या प्रार्थनेबद्दल देखील मी सर्वांचे आभार मानतो. आता माझी प्रकृती उत्तम असून उपचार सुरू आहेत.'' असा संदेश अभिनेता गोविंदा याने दिला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अभिनेता गोविंदा याच्या प्रकृतीची चौकशी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Iran Israel War: इराणचा इस्त्राईलवर मिसाईल हल्ला, भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?

Devendra Bhuyar News : दादांचा आमदार बरळला; भरसभेत ठरवली मुलींच्या सौंदर्याची कॅटेगरी, पाहा व्हिडिओ

Pune Helicopter Crash : तटकरेंना घेण्यासाठी जाताना दुर्घटना; हेलिकॉप्टर अपघातात 2 कॅप्टनसह एका इंजिनिअरचा मृत्यू, VIDEO

VIDEO: घोषणांचा पाऊस, अनुदानाचा दुष्काळ! कांदा उत्पादकांचे 24 कोटी कधी देणार?

Amit Deshmukh: सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर कारवाई करा, अमित देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT