Abdul Sattar: छत्रपती संभाजी नगर शहरातील एमआयडीसी चिकलठाणा परिसरात एन.आर.बी कंपनीच्या लगत दिसलेल्या बिबट्याचा वन विभागाच्या पथकाने शोध घेतला परंतु अद्यापही हा बिबट्या आढळून आला नाही. गेल्या 14 दिवसापासून या बिबट्याला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. मात्र हा बिबट्या वनविभागाला हुलकावणी देत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बिबट्याची शोध मोहीम सुरू राहील असे वन विभागाने सांगितलय. दरम्यान पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी चक्क बिबट्या हा राष्ट्रीय प्राणी असून त्याला पुढील 3 दिवसात पकडून जंगलात सोडा अश्या कडक सूचना वन विभागाला दिल्यात. यावरचाच हा खास रिपोर्ट...
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.