aaditya Thackeray and Devendra Fadnavis saam tv
Video

निवडणूक आयोगावर बोलल्यावर भाजपला का झोंबलं? आदित्य ठाकरेंचा सवाल | VIDEO

Aaditya Thackeray News : आम्ही निवडणूक आयोगावर बोलल्यानंतर भाजपला ते का झोंबतं असा खडा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. शरद पवार यांनी दावा केल्यानंतर भाजपने केलेल्या टीकेवर ठाकरे बोलत होते.

Nandkumar Joshi

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतांची चोरी झाल्याचा आरोप निवडणूक आयोगावर केला होता. त्यानंतर देशातील राजकारण पेटलं होतं. राहुल गांधींच्या आरोपांनंतर शरद पवार यांनीही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबद्दल खळबळजनक दावा केला होता. २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधी दोन जण दिल्लीत भेटण्यासाठी आले होते. त्यांनी महाविकास आघाडीला त्या निवडणुकीत २८८ पैकी १६० जागा जिंकून देण्याची हमी दिली होती. राहुल गांधींनाही ही ऑफर दिली होती. पण दोघांनीही ती नाकारली होती, असा दावा पवार यांनी केला होता. त्यावरून भाजपच्या नेत्यांनी टीका केली होती. या टीकेनंतर शिवसेना उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

शरद पवारांना निवडणुकीचा खुप मोठा अनुभव आहे. मात्र आम्ही निवडणूक आयोगावर बोलल्यावर भाजपला का झोंबलं? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी केला आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

अनेक वर्षे शरद पवार हे राजकारणात आहेत. त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. अनेक निवडणुका त्यांनी बघितल्या आहेत. मतांची चोरी ही उघडपणे झालेली आहे. निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालतं हे कळायला लागलं आहे. अनेकदा असं होतं की आम्ही निवडणूक आयोगावर बोलतो आणि भाजपला झोंबतं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Tenancy Agreements : भाडेकराराची नोंदणी ऑनलाइनच, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Jamnagar Tragedy : गणेश मूर्तीचं विसर्जन करताना पाण्याचा अंदाज चुकला; एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू

Maharashtra Government: राज्य सरकार मोठे निर्णय घेणार! ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवी पात्रता लागू

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा धसका? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Manoj Jarange Patil: भगवे रुमाल, टोप्या घालून ४०-५० पोलीस आंदोलनात शिरलेत; जरांगेंचा मोठा आरोप

SCROLL FOR NEXT