ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सोडण्यासाठी आदित्य ठाकरेंसह आंदोलकांनी पोलीस स्टेशन बाहेर जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांना सोडण्यात यावे यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस स्टेशमध्ये अमित, आदित्य ठाकरे दाखल झालेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंच्या नेतृत्त्वात मुंबईत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान शिवसेना भवनाबाहेर मोठा राडा झाला. दुसरीकडे दादरमध्ये मनसेकडूनही आंदोलन करण्यात आलं. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांची धरपकड केली. यावेळी आदित्य ठाकरेंनी पोलिसांची व्हॅन अडवली होती. त्यानंतर पोलिसांन पकडलेल्या आंदोलनकर्त्यांना सोडण्यासाठी आदित्य ठाकरेंनी थेट शिवाजी पार्क पोलीस स्टेशन गाठलं.
पोलीस स्टेशनबाहेर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी चालू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.