Nashik Dengue News Saam TV
Video

Nashik Dengue News : नाशिकमध्ये डेंग्युचा प्रादुर्भाव, 96 जणांना लागण

Tushar Ovhal

नाशिकमध्ये डेंग्युचे 96 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा 365 वर पोहोचला आहे. सिडको विभागात सर्वाधिक म्हणजेच 38 रुग्ण आढळले आहेत. तर नाशिकरोड भागात 21, नाशिक पूर्व भागात 15 नाशिक पश्चिम पंचवटी भागात 10 तर सातपूर भागात 2 रुग्ण आढळले आहेत. डेंग्युवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. नागरिकांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेण्यापेक्षा खासगी रुग्णालयात उपचार घेणं पसंत केले आहे. तर दुसरीकडे डेंग्युचे रुग्ण वाढल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. आता प्रशासनाने डेंग्यु निर्मुलनासाठी जनजागृती मोहीम राबवायला घेतली आहे. तसेच डेंग्युच्या डासांची उत्पत्ती कारणीभूत ठरलेल्या आस्थापना आणि व्यक्तींना नोटीस जारी करण्यात आल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : गणेशाच्या कृपेने 'या' 5 राशींच्या सर्व इच्छा होतील पूर्ण

Dombivli News : विरार-आलिबाग कॉरिडॉर प्रकल्पावरून शेतकरी आक्रमक; सरकारला दिला मोठा इशारा, कारण काय?

Hathras Road accident : तेराव्यावरून परतताना अनर्थ घडला; भीषण अपघात १५ जणांचा मृत्यू, कुटुंबावर शोककळा

Maharashtra Politics : 'लाडक्या बहीणी'वरून महायुतीत श्रेयवाद; अजित पवारांनी मुख्यमंत्री शब्द वगळल्यानं महाभारत, पाहा व्हिडिओ

Dengue in Maharashtra: सावधान! ऑक्टोबर, नोव्हेंबर धोक्याचा, राज्यात डेंग्यू थैमान घालणार? 'ही' लक्षणे दिसताच घ्या वैद्यकीय सल्ला

SCROLL FOR NEXT