MNS to move Court Against Mahayuti Candidate those who won Unapposed saam tv
Video

महायुतीचे ६५ उमेदवार बिनविरोध, राज ठाकरेंकडे पुरावे, मनसे कोर्टात जाणार

Municipal Election : महापालिका निवडणुकांसाठी मतदान अद्याप व्हायचे आहे. त्याआधीच महायुतीचे ६५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. याबाबत आता मनसे कोर्टात धाव घेणार आहे.

Nandkumar Joshi

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. २ जानेवारीला अर्थात काल शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत होती. या दिवशी अनेक ठिकाणी उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. मात्र, आतापर्यंत राज्यभरात महायुतीचे ६५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. याबाबत आता शंका उपस्थित केली जात आहे. यापूर्वी एखाद-दुसरा उमेदवार बिनविरोध निवडून येत होता, पण यावेळी दबाव टाकल्यानं अनेकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मनसेनं तर अर्ज मागे घेण्यासाठी संबंधित उमेदवारांना पाच - पाच कोटी दिल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे उमेदवारांनी अर्ज का मागे घेतले, याचे पुरावे आमच्याकडे आहेत, असा दावा मनसेने केला आहे.

राज्यातील पालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या ६५ उमेदवारांविरोधात आता मनसे कोर्टात धाव घेणार आहे. येत्या ५ जानेवारीला कोर्टात जाणार आहे. ठाणे, कल्याण डोंबिवलीसह राज्यात निवडून आलेल्या महायुतीच्या ६५ उमेदवारांच्या विरोधात राज ठाकरे यांच्याकडे पुरावे आहेत. येणाऱ्या सभांच्या माध्यमातून राज ठाकरे उमेदवारांची पोलखोल करणार आहेत. कॉल रेकॉर्ड, व्हिडिओ यांच्यासह अनेक महत्त्वाचे पुरावे राज ठाकरे यांच्याकडे नेत्यांनी दिल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma Viral Post: रोहित शर्मा मोठी घोषणा करणार; 'त्या' एका पोस्टने उडाली खळबळ, आभाळाऐवढी उत्सुकता

Horoscope: जीवनात येणार नवं प्रेम; ४ राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा; खर्चावर ठेवा नियंत्रण

मी अजितदादांसोबत बारामतीला जाणार, एअर होस्टेस पिंकी माळीचे वडिलांसोबतचे शेवटचे शब्द

अजित पवारांचा अपघात कसा झाला? ब्लॅक बॉक्स सापडला, गूढ उकलणार?

दादांचा पायलट दोन वेळा निलंबीत, 2 वेळा दारू पिऊन उडवलं विमान

SCROLL FOR NEXT