Money  Saam Tv
Video

महाराष्ट्रातील मंदिरातही घोटाळा, ६० कोटींचा गैरव्यवहार उघड, महिला अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Sant Balumama Devasthan Trust : कोल्हापूरातील श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये तब्बल ६०.७५ कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला आहे. धर्मादाय विभागातील अधिकाऱ्यांसह संबंधित कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Namdeo Kumbhar

कोल्हापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये तब्बल ६० कोटी ७५ लाख रुपयांचा प्रचंड आर्थिक गैरव्यवहार आणि घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी धर्मादाय कार्यालयाच्या तत्कालीन निरीक्षण अधिकारी रागिणी खडके, रावसाहेब कोणकेरी यांच्यासह संबंधित कंत्राटदाराविरोधात भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवस्थान ट्रस्टचा धनादेश बेकायदेशीररित्या हस्तांतरित करणे आणि जमिनींच्या खरेदी-विक्रीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याप्रकरणी संशयित धर्मादाय निरीक्षक रागिणी झुंबरलाल खडके यांना काही दिवसांपूर्वीच सेवेतून निलंबित करण्यात आले होते. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बाळूमामा देवाच्या ट्रस्टमध्ये एवढा मोठा घोटाळा उघडकीस आल्याने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Sweet Foods For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी ५ गोड पदार्थ फायदेशीर; रक्तातील साखर राहील नियंत्रणात

H1N1 flu symptoms: साधा ताप समजून दुर्लक्ष करताय? H1N1 ची ही गंभीर लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या

Tingling In Feet : तुमच्या पायांना सतत मुंग्या येतात; 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, असा कराल बचाव?

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावरील दरोडाच्या सूत्रधार बीडमधून जेरबंद

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा? 14,298 पुरुषांना मिळाले ₹1,500; धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT