Building Roof Collapsed In Bhandara Saam Tv
Video

VIDEO : गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक इमारतीचे छत कोसळले, ३० ते ४० महिला जखमी

Building Roof Collapsed In Bhandara: भंडाऱ्यामध्ये गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गेलेल्या महिला जीर्न इमारतीच्या छतावरून खाली पडल्या. यामध्ये ३० ते ४० महिला जखमी झाल्या.

Priya More

भंडाऱ्यामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठी दुर्घटना घडली. मिरवणूक बघताना इमारतीचे छत अचानक कोसळले. या घटनेमध्ये ३० ते ४० महिला जखमी झाल्या आहेत. या महिला किरकोळ जखमी झाल्या असून उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गणपती विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी या सर्व महिला जीर्ण इमारतीवर चढल्या होत्या. त्यावेळी अचानक जीर्ण इमारतीचे छत कोसले. ही घटना लाखांदूर तालुक्यातील बारव्हा येथे घडली. या घटनेत ३० ते ४० महिला असून त्यांना किरकोळ मार लागला आहे. बारव्हा पेठ येथे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे वतीने गणेश उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. १० दिवस विविधरंगी कार्यक्रम साजरे करण्यात आले.

गणरायाच्या विसर्जनासाठी डीजे, विविधरंगी झाकी आणि लेझीमच्या तालावर गणेशभक्त नाचत होते. ही मिरवणूक पाहण्यासाठी काही महिला जीर्ण इमारतीवर चढल्या होत्या. त्याचवेळी अचानक जीर्ण इमारतीचे छत कोसळले. टिनाचे शेडखाली अनेक महिला उभ्या होत्या. त्यांच्यावर टिनाचे शेड कोसळले. मात्र सिमेंटचे छताखाली टिनाचे शेड असल्यामुळे नऊ महिला किरकोळ जखमी झाल्या. तात्काळ जमावाने सर्व टिनाचे शेडच उचलून धरले आणि जखमींना तात्काळ उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बारव्हा येथे दाखल करण्यात आले. जखमींवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: रिंकल्स आणि डाग कायमचे कमी करायचे आहेत? मग आठवड्यातून ३ वेळा लावा 'हा' फेसपॅक

Maharashtra News Live Update: सोनोशी–पिंपरखेड शिवारात अस्वलाचा धुमाकूळ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

बँक कर्मचाऱ्यांची चांदी! पगारात होणार भरघोस वाढ; अर्थ मंत्रालयाने नेमका काय आदेश दिला?वाचा सविस्तर

भाजपमध्ये गेलेले ७ खासदार पुन्हा आम आदमी पार्टीत परतणार? काय आहे राइट टू रिकॉल?

Glowing Skin Detox Drink: ग्लोईंग स्किनसाठी 'हे' 1 ड्रिंक ठरतंय वरदान, ७ दिवसांतच दिसेल रिझर्ट

SCROLL FOR NEXT