Crime Branch officers escort the accused as the ₹252 crore drug nexus investigation sends shockwaves through the entertainment industry. Saam Tv
Video

252 कोटींचं ड्रग्ज कनेक्शन उघड; दाऊदचा भाचा, श्रद्धा कपूरच्या नावाचा समावेश, मनोरंजन विश्वात खळबळ|VIDEO

Bollywood Drug Connection Case: मुंबईत उघड झालेल्या 252 कोटींच्या ड्रग्ज कनेक्शनने बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. दुबईहून आणलेल्या आरोपीच्या चौकशीत उच्चप्रोफाइल पार्ट्यांमध्ये अमली पदार्थ पुरवठ्याचे संकेत मिळाले असून गुन्हे शाखा संबंधित व्यक्तींना समन्स पाठवण्याच्या तयारीत आहे.

Omkar Sonawane

मुंबईत बॉलीवूडच्या सेलिब्रिटींशी संबंधित ड्रग्ज कनेक्शनचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. दुबईहून आणण्यात आलेला आरोपी मोहम्मद सलीम शेख याने चौकशीत अनेक नामांकित कलाकारांच्या देश विदेशातील पार्ट्यांमध्ये अमली पदार्थ पुरवल्याचा दावा केल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीम शेखने मुंबई, गोवा आणि दुबईतील आयोजित पार्ट्यांमध्ये कोकेनचा पुरवठा झाल्याचं संकेत दिले आहेत. यासंदर्भात न्यायालयात सादर केलेल्या प्राथमिक यादीत काही कलाकार व इतर व्यक्तींची नावं समोर आली आहेत.

यात अभिनेत्री श्रद्धा कपूर, तिचा भाऊ सिद्धार्थ कपूर, निर्माता-दिग्दर्शक अब्बास–मस्तान, अभिनेत्री नोरा फतेही, इन्फ्लुएन्सर ओरी, तसेच हसीना पारकरचा मुलगा अलीशाह पारकर यांचा उल्लेख असल्याचं स्रोतांमधून समजतं. गुन्हे शाखेने यामधील सर्व व्यक्तींना चौकशीसाठी समन्स पाठवण्याची तयारी सुरू केली असून कोणाचाही सहभाग सिद्ध झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे मुंबईतील मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली असून पुढील काही दिवसांत अजून कोणाकोणाची नावे समोर येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

By-Election Results: बिहारनंतर भाजपनं जम्मू-काश्मीरमध्ये उधळला गुलाल; CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का, जाणून घ्या सर्व ८ पोटनिवडणुकांचे निकाल

DRIची मोठी कारवाई; मुंबई विमानतळावर १७.१८ कोटींचं कोकेन जप्त, टांझानियाच्या महिलेला अटक

Bihar Election Result Live Updates : बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक - राहुल गांधी

Fact Check : 7 तारखेला पगार न मिळाल्यास बॉसला जेल? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? जाणून घ्या

Bihar Politics : बिहारमध्ये काँग्रेसचं पानिपत; कोणत्या चुका ठरल्या पराभवाचं कारण?

SCROLL FOR NEXT