NDA सरकारकडून केंद्रीय मंत्री निर्मला सितारामण या अर्थसंकल्प सादर करत आहेत. दरम्यान त्यांनी पीएम सुर्यघर मोफत वीज योजनेची मोठी घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत रुफटॉर सोलार सिस्टम घरांवर लावण्यात येणार. त्यामुळे उपभोक्त्यांना दर महिना ३०० यूनिट पर्यंत वीज मोफत मिळमार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार 75,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करणार आहे. एक कोटी घरांना प्रकाश देणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी निवासी ग्राहक ऑनलाइन अर्ज करू शकतात. याबाबत माहिती पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.