Astro, Married life issue  Saam Tv
वास्तु

Vastu Tips : वैवाहिक जीवन सुखी करायचे आहे? तर, आपल्या घरातील 'या' गोष्टींची घ्या काळजी

आपले दाम्पत्य जीवन का बिघडते ? आपल्या स्वभावानुसार किंवा आपल्या ग्रहानुसार त्याच्यावर काही परिणाम होतो का जाणून घेऊया.

कोमल दामुद्रे

Vastu Tips : आपल्यापैकी प्रत्येकाला असे वाटते आपले वैवाहिक आयुष्य सुखी असायला हवे. आपल्यापैकी बरेच जण वैवाहिक आयुष्यातील वादामुळे कंटाळतात. आपल्याकडे संपत्ती, घर व इतर सुखी सोयी पुरेपुर असतात.

वैवाहिक जीवन गोड नसेल तर असे जीवन निरर्थक आहे. इतकं असलं तरी वैवाहिक जीवनात त्रास, घरात अशांतता, तणावाचं वातावरण, कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद, वाद असतील तर अशा जीवनाला आपण यशस्वी म्हणू शकत नाही. या आधुनिक युगाच्या गर्दीत त्रस्त माणसाला काय हवे असते? तो घरी आल्यावर शांततेचे काही क्षण सर्व त्रास विसरून कुटुंबातील (Family) सदस्यांमध्ये आनंदात घालवतो.

सामान्यतः कुंडलीच्या सातव्या घरातून वैवाहिक जीवनाचा विचार केला जातो. सप्तम भावात अशुभ ग्रहांचा प्रभाव असेल तर वैवाहिक सुखात बाधा येते. नैसर्गिक अशुभ ग्रहांमध्ये सूर्य, मंगळ, शनि, राहू आणि केतू यांचा समावेश होतो. आपले दाम्पत्य जीवन का बिघडते ? आपल्या स्वभावानुसार किंवा आपल्या ग्रहानुसार त्याच्यावर काही परिणाम होतो का जाणून घेऊया.

ज्योतिष्य शास्त्रानुसार कुंडलीतील शुक्र आणि गुरु कमजोर असल्यास वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होतात. कुंडलीतील सप्तम भावात पाप ग्रह असल्यासही वैवाहिक आयुष्यात अनेक वाद निर्माण होतात. तसेच छोट्या छोट्या कारणांमुळे देखील वाद निर्माण होऊ लागतात.

दाम्पत्य जीवन सुखी करण्यासाठी आपण काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊया.

१. काही गोष्टी सुधारण्यासाठी किंवा आपल्या वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी आपण आपल्या बेडरुममध्ये बदल करायला हवे. त्यासाठी पत्नीने पतीच्या उजव्या बाजूला झोपावे. गरज असेल तर एकाच उशीचा वापर करावा.

२. वेगवेगळ्या अंथरुणाचा वापर करु नका यामुळे नात्यात अधिक ताणतणाव निर्माण होऊ शकतो. तसेच आपल्या बेडरुमचा रंग हा गुलाबी किंवा फिकट हिरवा असायला हवा. कधीही आपल्या बेडरुममध्ये गडद रंगांचा वापर करु नये जसे की, काळा, निळा व लाल

३. झोपण्यापूर्वी आपल्या बेडरुममध्ये कापूर जाळा, यामुळे त्या रुममधील नैतिक ऊर्जा निघून जाण्यास मदत होईल. झोपताना आपले डोके हे पूर्व किंवा दक्षिण दिशेला असायला हवे. यामुळे आपल्या नात्यात (Relation) गोडवा येऊ शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

SCROLL FOR NEXT