Vastu Tips Saam Tv
वास्तु

Vastu Tips : दिवाळीत वास्तुशास्त्रानुसार घरातील 'या' दिशेला अधिक महत्त्व !

वास्तुशास्त्रानुसार दिवाळीच्या काळात घराची- ऑफिसची पूजा करताना काय काळजी घ्यायल हे जाणून घेऊया

कोमल दामुद्रे

Vastu Tips : दिवाळी म्हटलं की, सर्वत्र रोशणाई. दिव्याची आरास, रांगोळींचे रंग. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. यंदा दिवाळी २४ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. दिवाळीच्या काळात आपण अनेक गोष्टीची खरेदी करतो. आपल्या घराला नवनवीन गोष्टींने आपण सजवतो.

दिवाळीच्या (Diwali) काळात आपण घरात अशा काही वस्तू आणतो ज्याचे महत्त्व आपल्याला माहित नसते किंवा कोणत्या ठिकाणी कोणती वस्तू वास्तूनुसार ठेवावी हे आपल्याला कळत नाही. वास्तुशास्त्रानुसार दिवाळीच्या काळात घराची- ऑफिसची पूजा करताना काय काळजी घ्यायल हे जाणून घेऊया

  • वास्तुशास्त्रानुसार घर (Home) किंवा ऑफिसमध्ये ईशान्य कोन सर्वात महत्त्वाचा मानला जातो. या कोनात देवांचा वास असतो असे मानले जाते. त्यामुळे दिवाळीची स्वच्छता करताना घराचा हा भाग सर्वात आधी स्वच्छ करा.

  • ईशान्येकडे कोणतीही घाण किंवा निरुपयोगी वस्तू ठेवू नका याची विशेष काळजी घ्या कारण असे केल्याने लक्ष्मीचे आगमन होत नाही. त्यामुळे ईशान्य दिशेला स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.

  • वास्तुशास्त्रानुसार घरातील ब्रह्मक्षेत्राचेही खूप महत्त्व आहे कारण हे स्थान खूप फलदायी मानले जाते. त्यामुळे दिवाळीच्या सणाच्या दिवशी ब्रह्म स्थानाची चांगली स्वच्छता करा आणि येथे कोणतेही मोठे फर्निचर व वापरात नसलेल्या वस्तू ठेवल्या जाणार नाहीत याची विशेष काळजी घ्या.

  • घराची पूर्व दिशा स्वच्छ ठेवणे देखील खूप महत्वाचे मानले जाते कारण या दिशेच्या स्वच्छतेमुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते. धनत्रयोदशीच्या दिवशीही पूजेच्या वेळी ही दिशा व्यवस्थित स्वच्छ करावी. यामुळे माँ लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि तिच्या भक्तांना आशीर्वाद देते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadevi Elephant: महादेवीनं चिमुकल्याला वाचवलं? महादेवी हत्तीणीचा व्हिडिओ व्हायरल?

Maharashtra Live News Update : गडचिरोलीत गरोदर मातेला चिखलातून काढावी लागली वाट

Mumbai-Pune : मुंबई-पुणे फक्त दीड तासात, काय आहे नवा प्लान| VIDEO

Mumbai local train Dispute : तिकीटावरून लोकलमध्ये वाद; रेल्वेच्या कार्यालयाची तोडफोड

Dadar Kabootar Khana: वीज कापली, खोली पाडली, जाळी लावण्याचे काम सुरू; दादरचा कबूतरखाना बंद होणार|VIDEO

SCROLL FOR NEXT