Vastu Tips
Vastu Tips Saam Tv
वास्तु

Vastu Tips : आरशात प्रसन्न दिसणारा चेहरा करु शकतो तुमच्या घराचा नाश, वास्तूचे 'हे' नियम लक्षात ठेवा

कोमल दामुद्रे

Vastu Tips : आरसा हे आपल्या सौंदर्यांचे प्रतिक आहे. त्यामध्ये आपण आपले सौंदर्य पाहू शकतो व त्यात त्याच्या तुटी देखील शोधू शकतो. सौंदर्य खुलवणारा हा आरसा घर सजवताना त्याच्या जागेचा विचार केला जातो.

आरसा हा जितका चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी फायदेशीर आहे तितकाच घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी देखील फायदेशीर (Benefits) आहे. आरश्यामुळे घराची शोभा वाढते परंतु, हाच आरसा तुमच्या घराचा नाश करु शकतो.

वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घरात असलेल्या सर्व गोष्टींव्यतिरिक्त, प्रत्येक कोपऱ्यातून सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. या ऊर्जेचा माणसाच्या जीवनावर सर्वात मोठा प्रभाव पडतो.

घरामध्ये वास्तुदोष नसल्यामुळे अनेक वेळा सुख-समृद्धी प्राप्त होते. तर दुसरीकडे घरामध्ये थोडासाही वास्तुदोष असेल तर व्यक्तीच्या प्रगतीवर, सुख-समृद्धीवर वाईट परिणाम होतो. अशा घरात उपस्थित असलेल्या वस्तूंपैकी एक म्हणजे आरसा.

वास्तुशास्त्रानुसार आरसा योग्य दिशेला असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण त्याच्या प्रभावामुळे व्यक्तीचे संपूर्ण आयुष्यही उद्ध्वस्त होऊ शकते. जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार आरशांशी संबंधित अनेक नियमांची काळजी (Care) घेणे अत्यंत आवश्यक आहे.

या दिशेला आरसा लावू नका

वास्तुशास्त्रानुसार घराच्या पश्चिम किंवा दक्षिण दिशेला कधीही आरसा लावू नये. कारण घरात राहणाऱ्या लोकांवर याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊन तेढ निर्माण होते.

फूटलेला आरसा

वास्तुशास्त्रानुसार, घरात असलेली कोणत्याही काचेला तडा गेल्यास किंवा ती फुटल्यास ती लगेच काढून टाकावी. कारण त्यातून जास्त नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : जगात भारी कोल्हापुरी, नरेंद्र मोदींचं कोल्हापुरात मराठीतून भाषण

Priyanka Gandhi: महागाई, बेरोजगारी...; लातूरमधून प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल

Pravin Darekar On Onion News | कांदा निर्यातीवर प्रवीण दरेकरांची EXCLUSIVE प्रतिक्रिया

Priyanka Gandhi News | देशात मोठी बेरोजगारी आहे, प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल

Mumbai - Pune Highway Bus Fire News | मुंबई - पुणे महामार्गावर बसला भीषण आग

SCROLL FOR NEXT