Vastu tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वास्तु

स्वयंपाकघरातील या तेलाने दूर करा वास्तुदोष

घरातील वातावरण खेळते असेल तर आपली वास्तू देखील आनंदी राहते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्या सगळ्यांना आपले घर आवडत असते. घरातील वातावरण खेळते असेल तर आपली वास्तू देखील आनंदी राहते.

हे देखील पहा-

वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही घरात वास्तुदोष असल्यास सुख, शांती आणि कौटुंबिक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. वास्तुदोषामुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा व्यक्तीच्या नशिबावर वाईट परिणाम होतो. तसेच घरातील लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे घरातील माणसे सतत आजारी पडतात, घरात सतत क्लेश निर्माण होणे. आर्थिक समस्यांना सामोरे जाणे यांसारख्या गोष्टींना सामोरे जावे लागते. घरातील वास्तूदोष हटवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करुनही आपल्याला अपयश येते अशावेळी आपण काय करायला पाहिजे हे जाणून घेऊया.

१. मोहरीचे तेल (Oil) जितके पदार्थाची चव वाढवते तितकेच ते उपयुक्त ही आहे. याचा वापर करुन आपण घरात सुख-समृद्धी आणू शकतो

२. घराच्या पश्चिमेला मोहरीचे तेल एका काचेच्या (Glass) वाटीत भरून ठेवल्यास घरातील वास्तुदोष नाहीसा होतो आणि घरात समृद्धी येते.

३. एखाद्या आश्रमात मोहरीचे तेल व पीठ दान केल्यास घराला सौख्य लाभते.

४. रात्री झोपण्यापूर्वी पाण्यात मोहरीचे तेल मिसळून त्या पाण्याने हात-पाय धुतल्यास तणाव व थकवा जातो. घरातील नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मक ऊर्जेतही वाढ होते.

५. रोज स्नान केल्यानंतर घराच्या मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंना थोडे थोडे मोहरीचे तेल टाका. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येईल व अशुभ ग्रहांचा प्रभावही नष्ट होईल. तसेच पैशाची चणचणही दूर होण्यास मदत होईल.

६. शनिवारी वाटीत मोहरीचे तेल ठेवून त्यात आपले प्रतिबिंब पाहा व ते तेल शनी मंदिरात ठेवा. तसेच शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करा. यामुळे शनिदेव प्रसन्न होतील.

७. व्यापारात यश मिळण्यासाठी रोज तिजोरीवर मोहरीच्या तेलाने स्वस्तिक बनवा व त्याच्या चारी कोपऱ्यांवर शेंदूर लावावा. असे केल्याने घरातील वास्तूदोष नाहीसा होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gaikwad: सिंहगडावरून पडला,पाच दिवस जंगलातच, गौतम गायकवाडच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट!

Passenger Boat Accident: समुद्रात 10 प्रवासी घेऊन जाणाऱ्या बोटीला नेव्हीच्या स्पीड बोटीची धडक

Russia-Ukraine War: भारतच रशिया-युक्रेनमध्ये शांतता घडवणार? पुतीन-झेलेन्स्की भारतात येणार

Maratha Reservation: 'चलो मुंबई'! मनोज जरांगेंचा रोष नेमका कोणावर? आंदोलनाचा रोड मॅप नेमका कसा?

Sleep and Earn: झोपा आणि झोपण्याचे पैसे कमवा, 9 तास झोपा, 10 लाख मिळवा

SCROLL FOR NEXT