Vastu tips in Marathi, Vastu Tips For Door Bells, vastu shastra for home entrance
Vastu tips in Marathi, Vastu Tips For Door Bells, vastu shastra for home entrance ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वास्तु

घराला डोर बेल लावत असाल तर हे नियम जाणून घ्या,अन्यथा संकटात सापडाल !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्या आजूबाजूला अनेक सकारात्मक व नकारात्मक ऊर्जा असतात परंतु, त्याची आपल्याला कानोकान खबर नसते. वास्तुशास्त्रानुसार घरातील कोणतेही काम करताना त्याची दिशा, वेळ, दिवस व मुहूर्त आपण पाहायला हवे. (Vastu Tips in Marathi)

हे देखील पहा-

सध्या बदलेल्या पिढीनुसार व तंत्रज्ञानानुसार आपण वास्तुशास्त्रावर कितपत विश्वास ठेवतो हे आपल्यावर असते. आपल्या वास्तूमध्ये विशेषत: आवाजाला महत्त्व दिले गेले आहे. आराडाओरड, गोंगाट यांने आपल्या वास्तूवर नकारत्मक ऊर्जा प्राप्त होते व गोड आवाजामुळे आपल्या सभोवतालचे वातावरण प्रसन्न करुन आपल्याला सकारात्मक ऊर्जा देते. आपल्या वास्तूच्या आत किंवा वास्तूच्या बाहेर कोणत्या गोष्टी असायला हव्या. डोअर बेल कोणती हवी ? तिचा आवाज व दिशा याबद्दल जाणून घेऊया.

वास्तूशास्त्रानुसार हे नियम लक्षात ठेवा -

१. वास्तूशास्त्रात असे मानले जाते की, दारावरची बेल वाजल्याने घराचे वातावरण प्रसन्न व सकारात्मक बनते. मंत्रोच्चार असलेली डोअर बेल लावायची असल्यास घराच्या आग्नेय भिंतीच्या पूर्व दिशेला असायला हवी

२. घरासाठी (Home) पक्ष्यांच्या आवाजाची डोअर बेल लावत असाल तर ती उत्तर-पश्चिम भिंतीवर लावल्यास सर्वात शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार या दिशेने घरात हवेने प्रवेश केल्यास संपूर्ण वातावरण सकारात्मक ऊर्जा पसरते.

३. दाराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर डोअर बेल लावत असाल तर त्याची दिशा ही उजवीकडील असायला हवी. उजव्या हाताने बेल वाजवल्यास घराबाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही.

४. आपले कौटुंबिक (Family) संबंध सुदृढ करण्यासाठी आपण डोअर बेलचा स्विच हा आपल्या नावाच्या प्लेटच्यावर लावायला हवा. त्यामुळे आपल्या घरात सुख व समृध्दी नांदते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case : 'माझ्याबाबत जे घडलं ते,...; मारहाणीच्या घटनेनंतर आप नेत्या स्वाती मालीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

Mega block : मध्य रेल्वेवर आजपासून पंधरा दिवस ब्लॉक; कोणत्या मार्गांवर होणार परिणाम? जाणून घ्या

Maharahstra Election: अजित पवार गेले कुठे? अखेरच्या टप्प्यात अजित पवारांची प्रचाराकडे पाठ?

Shirur Lok Sabha Election 2024: हडपसर ठरवणार शिरूरचा खासदार?, संसदेत कोण जाणार कोल्हे की आढळराव?

Maharashtra Politics 2024 : मोदींच्या सभेत कांद्यावरून गोंधळ; नाशिकच्या भाषणात तरुणाची घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT