Vastu tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वास्तु

तांदळाचा वापर करुन घरात आणा सुखसमृध्दी

तांदळाचा वापर स्वयंपाकघरापासून ते अनेक धार्मिक कार्यात त्याचा वापर केला जातो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : तांदळाचा वापर स्वयंपाकघरापासून ते अनेक धार्मिक कार्यात त्याचा वापर केला जातो. तांदळाला वास्तूशास्त्रात महत्त्वाचे स्थान आहे.

हे देखील पहा -

धार्मिक विधीपासून लग्न कार्यात तांदळाला महत्त्व दिले जाते. लग्न कार्यात तांदळाला अक्षता म्हणून त्याचा वापर करतात. पूजेत कुठल्याही सामग्रीची कमी असल्यास तांदळाचा वापर करतात. जेवणात तांदळापासून विविध भाताचे प्रकारे खाल्ले जातात तसेच धार्मिक कार्यात अक्षतांच्या रूपात तो वापरला जातो. याच तांदळाचा वापर करून घरात सुखसमृद्धी कशी आणता येईल ते पाहू.

या प्रकारे घरात तांदळाचा वापर करा-

१. जेवण्याच्या ताटात भात नेहमी उजव्या बाजूला ठेवावा तसेच कधीही उष्टा टाकू नये. यामुळे घरातील सुखसमृध्दी नष्ट होते. त्यासाठी तांदळाचा जपून वापर करायला हवा.

२. शुभमुहूर्त असेल किंवा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी २१ अखंड तांदूळ घेऊन त्यांना हळद लावा व लाल रेशमी वस्त्रात त्यांना बांधा. ही पुरचुंडी आपल्या घरातील लक्ष्मीमातेसमोर ठेवून त्याची पूजा करावी. नंतर ती तिजोरीत ठेवावी. यामुळे धनप्राप्ती होते.

३. नोकरी मिळण्यास त्रास होत असेल किंवा नोकरीच्या ठिकाणी अनेक अडचणी येत असल्यास आपण महिनाभर कावळ्याला गोड भात खाऊ घातल्यास त्याचा फायदा होतो.

४. शुक्रवारी रात्री चौरंगावर कलश ठेवून त्यावर केशराने स्वस्तिक बनवा. त्या कलशात पाणी भरा. त्यात तांदूळ (Rice), दुर्वा व १ रुपयाचे नाणे टाकावे. एक लहान ताटलीत तांदूळ भरून ते कलशावर ठेवावेत. चारमुखी दिवा लावून त्याची कुंकवाने पूजा करावी. थोडा वेळ लक्ष्मीमातेचे ध्यान करावे व आपल्या पैशासंबंधित समस्यांचे निवारण करण्याची प्रार्थना करावी. यामुळे आर्थिक समस्या दूर होतील.

५. अमावस्येच्या दिवशी तांदळाची खीर बनवून त्यात चपाती चुरून कावळ्यांना खाऊ घातल्यास पितृदोष नाहीसा होतो.

६. शुभमुहूर्तावर किंवा पौर्णिमेच्या दिवशी पिवळे तांदूळ मंदिरात अर्पण केल्यास आपल्या मनोकामना पूर्ण होतात.

७. कुंडलीत चंद्राचा दुष्प्रभाव असेल तर आपल्या आईकडून मूठभर तांदूळ विधीपूर्वक दान घ्यावेत. यामुळे फायदा होईल.

८. अर्धा किलो तांदूळ घेऊन शिवमंदिरात शिवलिंगाची (Shiva) पूजा करून मूठभर तांदूळ दोन्ही हातांनी शिवलिंगावर वाहावेत. उरलेले तांदूळ दान करावेत. असे लागोपाठ पाच सोमवारी केल्यास आपल्या आर्थिक समस्या दूर होतील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT