Vastu tips  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वास्तु

घरातील कपाटाची दिशा कशी ठरवाल ?

स्वयंपाकघरापासून ते घरातील इतर प्रत्येक गोष्टींची जागा ही आधीपासून ठरवली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : वास्तूशास्त्रानुसार आपल्या घरासाठी काही नियम असतात. ज्याचा वापर करुन आपण घरातील इतर गोष्टींची दक्षता घेऊ शकतो.

हे देखील पहा-

आपल्या घरातील बऱ्याच गोष्टींची जागा ठरलेली असते. स्वयंपाकघरापासून (Kitchen) ते घरातील इतर प्रत्येक गोष्टींची जागा ही आधीपासून ठरवली आहे. प्रत्येक दिशेचे त्याच्यानुसार महत्त्व असते त्या दिशेचे चांगले व वाईट असे दोन्ही स्वरुपाचे फले मिळतात. आपल्या घरातील महत्त्वाच्या किंवा मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी आपण कपाटाचा वापर करतो. कपाटात कपडे ठेवण्यापासून ते दागिने ठेवण्याची योग्य सोय असते परंतु, कपाट हे योग्य दिशेला न ठेवल्याने आपल्याला अनेक आर्थिक समस्यांना (Problems) तोंड द्यावे लागते. कपाटाची दिशा योग्य नसेल तर सतत पैश्यांची चणचण भासते त्यासाठी कपाटाची योग्य दिशा कशी ठरवाल हे जाणून घेऊया.

१. आपल्या घरातले कपाट हे नेहमी नैऋत्य दिशेलाच ठेवावे. या जागी कपाट ठेवल्याने कपाटात पैशाची कधीही चणचण भासत नाही. घराच्या ईशान्य कोपऱ्यात कपाट ठेवणे अशुभ मानले जाते.

२. कपाट जरी नैऋत्य दिशेला ठेवले असेल तरी त्याची दार उघडताना किंवा त्याचे तोंड हे दक्षिण दिशेला नसावे. त्यामुळे आपल्याकडे पैसा टिकत नाही.

३. कपाट ठेवताना त्याखाली स्टँड, पेपर किंवा एखादा कापड अंथरावा.

४. कपाटातील तिजोरी रिकामी ठेवू नये. तिजोरीत पैसे किंवा दागिने ठेवावेत त्यामुळे घरात सुख समृध्दी नांदते.

५. कपाटात ५-७ चांदीची नाणी अवश्य ठेवावीत यामुळे कधीही पैशांची चणचण भासणार नाही.जर जास्त नाणी ठेवू शकत नसाल तर किमान दोन नाणी अवश्य ठेवावीत.

६. कपाटाचा रंग क्रीम वा फिकट पिवळसर असावा. हे दोन्ही रंग शांतीचे प्रतीक आहेत.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती युगेंद्र पवार आघाडीवर

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

SCROLL FOR NEXT