ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वास्तु

आपल्या घराच्या बागेत ही झाडे लावू नका, अन्यथा होईल नुकसान !

कोणत्या रोपट्यांना आपल्या घरासमोर लावू नये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्या प्रत्येकाला आपली बाग, परस फुलवेलेली आवडते. त्यासाठी आपण आपल्या घरासमोर अनेक रोपटे लावत असतो.

हे देखील पहा -

आपली बाग, टेरेस लॉन आणि घराचा आतील भाग सुंदर दिसण्यासाठी आपण विविध प्रकारची फुले आणि झाडे लावतो. त्यापैकी आपण काही झाडे ही औषधी (Medicine) वनस्पती म्हणून लावतो. त्यामुळे धार्मिक दृष्टिकोनातून घरात फुले व सर्व प्रकारची झाडे लावली जातात. वास्तूनुसार कोणती फुले आणि झाडे घरात लावणे अशुभ आहे आणि त्यांना घरात (Home) लावल्याने कोणत्या समस्या उद्भवू शकतात. त्याबद्दल जाणून घेऊया.

ही झाडे घरासमोर लावू नका-

१.मेहंदीच्या रोपाचा उपयोग हातावर रंग चढवण्यासाठी होतो. अनेक वेळा या वनस्पतीचा उपयोग औषधी गुणधर्मामुळेही केला जातो. पण या रोपाला घरात कधीही स्थान देऊ नये. असे मानले जाते की या वनस्पतीमध्ये अनेक नकारात्मक ऊर्जा असते. आपल्या शुभ कार्यात आपण मेहंदीचा वापर करतो पण तीच झाड आपल्या दारासमोर लावल्यास आपल्या शुभ कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात.

२.अनेकांना आपल्या बागेत कापसाचे रोप लावायला आवडते. पण वास्तूनुसार ही वनस्पती अशुभ मानली जाते. कापूस हा अनेक धार्मिक कार्यात आपण वापरत जरी असलो तरी त्यामुळे आपल्या अनेक संकटांना सामोरे जावे लागते. कापसाचे रोप घरात लावल्याने घरातील सदस्यांच्या आयुष्यात दुर्दैव आणि दारिद्र्य येऊ लागते. या वनस्पतीवर धूळ आणि घाण सहजपणे जमा होतात, त्यामुळे घराभोवती नकारात्मकता राहते. त्यामुळे घरामध्ये कापसाचे रोप कधीही लावू नये.

३. चिंच खायला आपल्यापैकी अनेकांना आवडतात. पण ह्या चिंचाचे रोपटे आपल्या घरातील बागेसमोर चुकूनही लावू नका. एवढेच नाही तर कोणत्याही जमिनीवर हे रोप लावले असेल तर त्या जमिनीवर घर बांधणेही टाळावे. तसेच घराजवळ कुठेही चिंच्याचे रोप लावले असल्यास तेथे राहणे टाळावे. कारण वास्तूनुसार चिंचेची वनस्पती अशुभ मानली जाते. या वनस्पतीमध्ये नकारात्मक ऊर्जा राहते. त्यामुळे ही वनस्पती घरात लावू नये.

४. तसेच, बाभूळ ही एक औषधी वनस्पती मानली जाते. बाभळीला असंख्य काटे असतात. वास्तूशास्त्रानुसार काटे असणारे कोणतेही रोपटे आपल्या घरासमोर लावू नये. वास्तूनुसार बाभूळ ही वनस्पती खूप अशुभ मानली जाते. या वनस्पतीतून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. त्यामुळे घरातील सदस्य आपापसात भांडत राहतात. शिवाय, मानसिक आजार होण्याचा धोका असतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Tourism: पार्टनरसोबत फिरायला जायचंय, मग कर्नाटकमधील 'या' ठिकाणी नक्की जा

VIDEO : 'तुला ऐकायला येत नाही का?' माऊलींच्या पालखीत चोपदाराचा उर्मटपणा, डोक्यावर तुळस असलेल्या महिलेला ढकललं

Maharashtra Politics: दोघही फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत, मराठी माणसाचा काय फायदा; उद्धव ठाकरेंनंतर राणेंचा राज ठाकरेंवरही हल्लाबोल

Assembly Session: शाळांमध्ये शिपाई व कर्मचाऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने – दादा भुसेंची विधानपरिषदेत घोषणा

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे? वाचा संपूर्ण प्रोसेस

SCROLL FOR NEXT