ही सडलेली बटाटी पाहा.. बुरशी आलेली ही बटाटी गुरं-ढोरंही खाणार नाहीत...मात्र पाणीपुरी विक्रेत्यांच्या लेखी तुम्हाला गुराढोरां इतकीही किंमत नसावी म्हणूनच ते याच बटाट्यांपासून बनलेले पदार्थ तुम्हाला खायला घालत असावेत...हा किळसवाणा प्रकार नाशिकमधील सातपूर परिसरातील आहे.
इथे सडलेले बटाटे, कलरमिश्रित चटणी, उघड्यावर पडलेल्या पुऱ्या, आणि अस्वच्छता पाहुन पालिकेचे अधिकारीही चक्रावले....त्यांनी सडलेले बटाटे जप्त केलीत तर चटणी गटारात ओतून नष्ट केली...
पाणीपुरी म्हटलं तर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. संध्याकाळी तर पाणीपुरीच्या गाडीवर अक्षरश: गर्दी उसळते. तुम्ही ही पाणीपुरी शौकीन असाल तर पाणीपुरी खाण्या आधी थोडा विचार करा... पाणीपुरीसाठी वापरले जाणारे पदार्थ खरेच चांगले आहे याची एकदा तरी चाचपणी करा..नाही तर ही पाणीपुरी तुमचा घात करेल
WebTittle :: You eat, water potatoes for rotten potatoes!
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.